महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अनेक देशांसाठी पवित्र मानली जाणारी नदी

06:33 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

3 धर्मग्रंथांमध्ये आहे उल्लेख

Advertisement

जगात काही नद्या अशा आहेत, ज्या भारतात नसूनही अत्यंत धार्मिक महत्त्वाच्या मानल्या जातात. जॉर्डन दी असाच एक पौराणिक जलमार्ग आहे, ज्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. सुमारे 251 किलोमीटरपर्यंत फैलावलेली ही नदी मध्यपूर्वेतून वाहते, जी पूर्वेत जॉर्डन आणि पश्चिमेत इस्रायल आणि पॅलेस्टाइनदरम्यान सीमेचा हिस्सा ठरते.

Advertisement

या नदीचा उल्लेख एक नव्हे तर तीन धर्मांच्या पुस्तकांमध्ये आहे. जॉर्डन नदीचा ख्रिश्चन धर्माशी संबंध असल्याने जगभरातील ख्रिश्चनांसाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वात मोठ्या 10 नद्यांमध्ये सामील नसूनही जॉर्डन नदीला जगातील सर्वात जुन्या नद्यांपैकी एक मानले जाते. याचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. या नदीने संस्कृतींचे उत्थान अन् पतन पाहिले आहे आणि शतकांपासून स्वत:च्या काठावर राहत असलेल्या लोकांना उपजीविका प्रदान केली आहे.

जॉर्डन नदी ही जॉर्डन, इस्रायल आणि पॅलेस्टाइन समवेत आसपासच्या क्षेत्रांसाठी एक महत्त्वपूर्ण जलस्रोत म्हणून कार्य करते. एंटी-लेबनॉन पर्वतरांगेत ही नदी उगम पावते, स्वत:च्या पात्रात अनेक उपनद्यांना ही नदी सामावून घेते. नदीने शतकांपासून कृषी, वन्यजीव आणि समुदायांना जिवंत ठेवले आहे.

जॉर्डन नदी जॉर्डन आणि इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यादरम्यान नैसर्गिक सीमा ठरली आहे. उत्तरेपासून दक्षिणेच्या दिशेने ही नदी वाहते. जॉर्डन नदी शतकांपासून सैन्य, व्यापारी आणि शरणार्थींसाठी एक क्रॉसिंग पॉइंट स्वरुपात काम करत राहिली आहे. नदीच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रासंगिकतेला कमी लेखले जाऊ शकत नाही, कारण ही सर्व संस्कृतींच्या दस्तऐवजांसोबत जोडली गेलेली आहे.

मागील काही दशकात जॉर्डन नदीच्या पातळीत मोठी घट झाली आहे. एकप्रकारे याचे अस्तित्व संकटात सापडले आहे.  हवामान बदल, लोकसंख्या वाढ आणि पाणी वळविण्याच्या प्रकल्पांमुळे या संकटात भर पडली आहे. कमी होणारा प्रवाह केवळ पर्यावरणाला प्रभावित करत नाही, तर या नदीवर निर्भर असलेल्या समुदायांच्या उपजीविकेलाही प्रभावित करतो. या समस्येवर तोडगा काढण्याचा आणि नदीचे आरोग्य पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article