कुस्तीच्या आखाड्यात आरोपांची 'दंगल'
कोल्हापूर :
हजारो प्रेक्षकांच्या जल्लोषात पैलवान पृथ्वीराज पोहोळ याने महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली, पण त्यानंतर खरी 'दंगल' उसळली ती मैदानाबाहेर! उपांत्य फेरीत पराभूत घोषित केलेल्या डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांनाच लाथ मारली. त्यानंतर महाराष्ट्रभर क्रिया- प्रतिक्रियांचा धुरळा उडाला. जो अजूनही खाली बसायला तयार नाही.
दोन दिवसानंतरही कुस्तीच्या आखाड्यातील ही हवा तापलेलीच आहे. पैलवान राजेच्या समर्थनार्थ महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील मैदानात उतरला. पंचांना लावथ नाही, तर गोळ्या चालायला पाहिजे, अशी तीब्र प्रतिक्रिया त्याने गौदमिली. एमढेच नाही, तर मानाच्या दोन्ही गदा कुस्तीगीर संघाला परत करण्याचा इशारा मंगळवारी दिला. त्याचवेळी कुस्तीगीर परिषदेने पुन्हा अहिल्यानगरमध्येच महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा केली. या सर्व प्रकाराला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संपातील वादाची किनार असल्याची चर्चा आहे. दरम्यान कुस्ती पंढरी कोल्हापुरातील आजी-माजी मल्लांनी पा कुस्ती क्षेत्रातील पा प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.
- '...अन्यथा महाराष्ट्र केसरीची गवा परत करणार"
मंगळवारी सांगली येथे बोलताना डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले,ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याच्या इराण २००९ साली मी स्पर्धेत उतरली होती. महाराष्ट्र केसरीच्या आखाडयात मला जाणीवपूर्वक हरवण्यात आले होते. ज्याप्रमाणे पैलवान शिमराज राक्षेवर अन्याय झाला. तसाच प्रकार माझ्याबाबतीत २००९ सालच्या महाराष्ट्र. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झाला होता. पंचांच्या एका चुकीच्या निर्णयाने एखाधा मल्लाच्या आयुष्याच्या मेहनतीवर पाणी पडते. त्यावेळच्या परिषदेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर झालेला अन्याय मान्य केला आहे. परिषदेच्या सर्व पदाधिकाप्यांनी देखील माझ्यावरील अन्याय झाल्याची कबुली धामी, अन्यथा महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या दोन्ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला मी परत करणार आहे. पायायत त्यांनी भारत संवाद"ला सविस्तर प्रतिक्रिया दिली.
त्यांनी सांगितले की, २००७ साली तब्बल २८ वर्षानंतर सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळवून दिली होती. पुन्हा २००८ साली ३५ वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवून दिला होता. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात पाडस करून ट्रिपल महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा नी पहिला पैलवान होतो. २००९ साली पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मी तिसऱ्यांदा सहभागी झालो होतो.
- मी आत्महत्या करणार होतो
२००९ साली मला जाणीवपूर्वक पराभूत केले. पा घटनेचा माझ्या मनावर झालेला आयात आजही कायम आहे. पातुन मी अद्यापही बाहेर पडलेलो नाही. तेव्हापासून भी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पहायला दे खील जात नाही. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे मला हरवते मी आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत आलो होतो. मात्र सहकाज्यांच्या मदतीने धातून बाहेर पडलो. अशीच बेळ आज शिवराजबर आली असल्याची खंत चंद्रहार पाटील पांगी व्यक्त केली. सध्या कुस्तीगिर परिषद आणि संपात बाद आहे. आमच्यावेळी एक संघटना असूनही आमच्यावर अन्याय झाला. हे आता स्पष्ट होत आहे. मात्र अशा प्रकाराचा फटका भल्लांना बसत आहे. पंचांच्या एका निर्णयामुळे शिवराज राक्षेचं आयुष्य खराब झालं. असा आरोप करीत तिसऱ्यांदा महा- राष्ट्र केसरी झाल्यानंतर शिबराज रा डीवायएसपी झाला असता. मात्र आता तर त्याच्यावर तीन वर्षांची बंदी आ णली आहे. किमान त्याच्यावर बंदी घातली नसती, तर पुढच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तो खेळू शकला असता, असे त्याने नमूद केले.
या स्पर्धेत पंचांच्या चुकीमुळे मला जाणीवपूर्वक हरमून माझ्यावर अन्याय करण्यात आला होता. शिवराज राक्षेच्या बाबतीत देखील असेच घडले आहे. पाच सेकंदात दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे शिवराजचे आयुष्य बरबाद झाले आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरीची गदा हातात आली असताना केवळ पंचांच्या चुकीमुळे त्याचा किताब हुकला आहे. काल एका टीव्ही चॅनलवर झालेल्या लाईन्ड कार्यक्रमात कुस्तीगीर परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष अर्जुनवीर काकासाहेब पवार आणि कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी २००९ सालच्या स्पर्धेत देखील माझ्याबर अन्याय झाल्याची कबुली दिली आहे. या दोघांबरोबरच कुस्तीगीर परिषदेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील माइयामर झालेल्या अन्यायाची कबुली दिली. तर माझ्या मनाचे समाधान होईल. १६ वर्षापूर्वी मनावर झालेला आपात आजही कायम असून या संपूर्ण पटनेतून मला बाहेर पहायचे आहे. पांसाठी सर्वांनी कबूल केले नाही, तर दोन दिवसात मला मिळालेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरीच्या गदा मी कुस्तीगीर परिषदेला परत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.