For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकरी आंदोलकांची पुन्हा एकजूट

06:15 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेतकरी आंदोलकांची पुन्हा एकजूट
Advertisement

12 कलमी मागण्यांसाठी आज दिल्लीच्या दिशेने कूच : दिल्लीत 30 दिवसांसाठी कलम 144 लागू

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शेतकरी आंदोलकांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारपुढे अडचणी निर्माण केल्या आहेत. 12 कलमी मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली चंदीगड येथे 26 शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. मागण्यांबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मुंडा आणि नित्यानंद राय यांच्याशी चर्चा होणार आहे. कोणताही निष्कर्ष न निघाल्यास शेतकरी 13 फेब्रुवारीला दिल्लीकडे मोर्चा काढतील. 16 फेब्रुवारीला ‘भारत बंद’ची घोषणा करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीसह देशातील विविध ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा बंद करण्याची तयारी सुरू आहे.

Advertisement

शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाबाबत दिल्ली आणि हरियाणातील पोलीस हाय अलर्टवर आहेत. मंगळवारी 13 फेब्रुवारीला शेतकरी आंदोलक आपला मोर्चा दिल्लीच्या दिशेने वळवणार असल्याने दिल्ली पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केले आहे. कोणतीही अनुचित घटना आणि ‘सामाजिक अशांतता’ टाळण्यासाठी पुढील एक महिना शहरात कलम 144 लागू राहील, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणातील शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील अशी शक्मयता आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार, कोणत्याही प्रकारची रॅली किंवा मिरवणूक काढून रस्ते-मार्ग रोखण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच ट्रॅक्टर रॅलींना राष्ट्रीय राजधानीच्या सीमा ओलांडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कलम 144 लागू झाल्यामुळे दिल्लीत रस्ते अडवणे, कोणतेही आंदोलन, रॅली किंवा जाहीर सभा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. परवानगीशिवाय 5 किंवा 4 पेक्षा जास्त लोकांसह कोणत्याही प्रकारची निषेध रॅली किंवा जाहीर सभा करण्यास मनाई असेल. दिल्लीत ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रकच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच, लाठ्या, काठ्या, तलवारी अशा वस्तू असलेल्या वाहनाला दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही.

Advertisement
Tags :

.