कोडोली अर्बन बॅकेच्या निवडणूकीत सत्ताधारी गटाचा १४ जागावर दणदणीत विजय
वारणानगर प्रतिनिधी
सन १९६२ पासून संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील दि.कोडोली अर्बन को-ऑप बँकेच्या १४ जागांच्या साठी लागलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गोकुळ संचालक अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री राजश्री शाहू सत्तारूढ आघाडीने दनदनीत विजय मिळवला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतीम टप्यात सत्ताधारी गटाच्या तीन जागा बिनविरोध करत विरोधकांचा धुव्वा उडवत एकतर्फी विजय संपादन केला. पन्हाळा येथे सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजणे यांनी मतमोजणी नंतर निकाल जाहीर केला. यामध्ये ५४९६ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला यातील ५३१७ मते वैद्य ठरली तर १७९ मते अवैद्य ठरली.
दि.कोडोली अर्बन को-ऑप बँकेच्या विविध कारणांनी व आरोपांनी गाजलेल्या यावेळच्या निवडणुकीत,सलग पंधरा वर्षे चेअरमन पद भूषवलेल्या व आत्ता विरोधात असलेल्या राजेंद्र उर्फ आबासो हिंदुराव पाटील व त्यांचा पुतण्या विद्यमान संचालक अभिजित संभाजी पाटील यांच्यासह सौ. प्रेमा राजेंद्र पाटील, सुमित संजय पाटील, शामराव यशवंत पाटील यांचा देखील पराभवाची धुळ चाखावी लागली.
या निवडणुकीतील सत्ताधारी गटाचे विजयी उमेदवार व कंसात त्यांना पडलेली मते खालील प्रमाणे रघुनाथ बापू चौगले (४७२९), सुभाष विलास जद (४७३९),सचिन पांडुरंग जाधव (४७३९), आबासो केशव पाटील (४७१४),उदयसिंग शिवाजीराव पाटील (४७५८), यशवंत शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. जयंत प्रदीप पाटील (४७९२), प्रकाश गणपती पाटील (४७५७), विद्यमान अध्यक्ष राहुल प्रकाश पाटील (४७७६), श्रीपती बाबुराव पाटील (४६४७), बाळासो सर्जेराव माने (४६४७), रमेश दत्तात्रय मेनकर (४६६९),नितीन शिवाजीराव हुजरे (४५८१), लक्ष्मी रंगराव चौगले (४८४०), मनीषा फत्तेसिह पाटील (४८८१), दिलीप अण्णाप्पा गायकवाड (बिनविरोध), विवेक विश्वास जाधव (बिनविरोध), मनोहर बळवंत पाटील (बिनविरोध) निवडून आल्याचे जाहिर होताच सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.