हद्दवाढी विरोधातच ठराव देणार
कोल्हापूर :
शहर हद्दवाढ कोणत्याही परिस्थितीत करू दिली जाणार नाही, अशी ठाम भुमिका कोल्हापूर शहर हद्दवाढीत असलेल्या आठ गावांच्या सरपंच यांनी घेतली आहे. प्रस्ताव मागणीचा विषय आला तर आठ गावांचा हद्दवाढीला विरोध असाच ठराव असणार आहे. महानगरपालिकेकडून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव मागणीचे पञ दिले आहे. हद्दवाढीसाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीही आक्रमक झाली आहे. आज लाक्षणिक उपोषणाला पहिला टप्पा समितीतर्फे करण्यात येत आहे.
- ...प्रस्तावाबाबत अधिकृत सुचना नाहीत
राज्यशासनाकडून कोल्हापूर हद्दवाढीबाबत कोणतीही सुचना नाही, कोणतीही अधिकृत बैठक नाही, महानगरपालिका व जिल्हा परिषदेलाही कोणताही प्रस्ताव नाही. ग्रामपंचायतीला प्रस्ताव आला तरी हद्दवाढीला विरोध करणारा ठरावच असणार आहे. आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदिप नरके यांना विचारात घेतल्याशिवाय राज्य शासन कोणताही आदेश काढणार नाही. 2017 पासून प्राधिकरणाने गावाचा सक्षम विकास केला नाही, शहराच्या हद्दवाढीत गावांचा सहभाग नोंदवून काय विकास साधणार आहे. हद्दवाढ झाल्यास थेट ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनावर परिणाम होणार आहे. महानगरपालिका नागरिकांना दैनदिन सुविधा देउ शकत नाही, ते 8 गावांना काय सुविधा देणार आहेत. विकासाचा कोणताही आराखडा तयार नसताना गावे कशी सहभागी होणार आहेत, आतापर्यंत आलेल्या निधीमध्ये शहराचा विकास करू न शकणारे आता गावाचा काय विकास करणार आहेत.
- -उत्तम आंबवडे, कार्याध्यक्ष - हद्दवाढ विरोधी समिती, सरपंच उजळाईवाडी
...तर हद्दवाढीत स्वखुशीने येऊ
महानगरपालिका गटर स्वच्छता, बांधकामे, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती, कचरा निर्मूलन वेळेवर करू शकत नाही. या उलट ग्रामपंचायत प्रशासन सर्व कामे व्यवस्थित वेळेवर करते. ग्रामपंचायत सक्षम आहेत. आता जी कामे ग्रामपंचातीमधून तात्काळ मिळतात, तेच कागदपञे विविध कामे महानगरपालिकेकडून होत नाही. प्राधिकरणाच्यावतीने गावांचा ठरल्याप्रमाणे विकासकामे झाली नाहीत. प्राधिकरणचा निधी वाढवावा, गावासाठी आणखीन विकास करावा. प्राधिकरणाकडे ग्रामपंचायतीचा रस्ते, क्रिंडागण, मोकळ्या जागांचा विकास, असे अनेक प्रस्ताव पेंडिग आहेत. प्रस्ताव मागवून घेतले माञ एक रूपयाचेही विकासकाम नाहीत. प्राधिकरणाने आमच्या गावाच्या विकासाठी कोट्यावधीचा निधी द्यावा, महानगरपालिकेने पहिल्यांदा आपला विकास करावा, आम्ही स्वखुशीने शहरात जावू. सध्या तरी हद्दवाढ नको असाच ठराव असणार आहे.
-ए. व्ही. कांबळे, सरपंच मोरेवाडी
- गावांना एक हजार कोटी
जिल्हा परिषदेकडून आलेल्या प्रस्तावात हद्दवाढी विरोधात आम्ही सर्व गावे ठराव देणार आहे. ज्यांची गावे, हद्दवाढीत येत नाहीत असे लोकप्रतिनिधी हद्दवाढीचे समर्थन करत आहेत. समर्थन करणाऱ्या लोकप्रा]ितनीधींचे गावे हद्दवाढीत आली असती तर त्यांचाही हद्दवाढीला विरोधच असता. कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक, करवीरचे आमदार चंद्रदिप नरके यांनीही हद्दवाढी विरोधात भुमिका मांडली आहे. याबाबत आमच्या बैठकाही झाल्या आहेत. सर्वांचा हद्दवाढीला विरोधच आहे. प्राधिकरणकडून गावासाठी 1000 कोटी ऊपयांचा निधी द्वा, राज्यशासनाने 2000 कोटी ऊपये शहरासाठी द्वेत. शूक्रवारी (दि.4) आमदार अमल महाडिक यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले आहे. आ. महाडिक, आ. नरके यांची जी भुमिका आहे, तीच आमची भुमिका आहे.
-मधुकर चव्हाण, सरपंच, उचगाव
- शहरातील रस्ते शेतातील पाणंदीसारखे
हद्दवाढ झाल्यास शेतीवर आरक्षण पडणार, प्रत्येक जनावारांन कर, गोटा बांधला तर त्याला घरफाळा द्यावा लागणार आहे. शेतीबरोबर छोटे व्यवसाय सुऊ आहेत त्याच्यावरही कर भरावा लागला तर हद्दवाढ शेतकऱ्यावर अन्याय करणार आहे. यासाठी हद्दवाढीला आमचा कायमच विरोध आहे. उपनगरातील रस्ता शेताकडे जाणाऱ्या पाणंदीसारखा झाला आहे. सरळ रस्ते नाहीत. शहरात मध्यवस्तीमध्ये खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. आय. आर. बी सारख्या प्रकल्पाला विरोध शहरवासीयांनी केल्यामुळे कोणतेही चांगले प्रकल्प शहरात येत नाहीत; त्यामुळे शहरात विकास होत नाही. विकासासाठी शहरात प्रकल्प राबविणऱ्यांना भिती वाटत आह़े कृती समितीला घोबरून कोण टेंडर भरत नाहीत, त्यामुळे आमचा हद्दवाढीला कायमच विरोध आहे.
- सुमन विश्वास गुरूव, कळंबा संरपंच
- आदेश लादल्यास न्यायालयात जाणार
गावाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही शासनाने भुमिका घेवू नये, 42 गावांसाठी प्राधिकरण केले. प्राधिकरणाने गावाचा विकास केल्यानंतर हद्दवाढ हा विषय येतो. प्राधिकरणाने पहिल्या टप्याप पाचशे तर दुसऱ्या टप्यात हजार कोटी ऊपये देणार असल्याचे सांगितले; माञ गावाचा विकास झाला नाही. हद्दवाढ झाल्यास शहराकडे कोणताही भोगोलिक आराखडा नाही. कोणतेही प्लॅनिंग नाही, कोल्हापुरचा विकास न करणारे ग्रामीण भागाचा काय विकास साधणार आहेत. गावावर कोणताही आदेश लादल्यास ग्रामपंचायतीची न्यायालयात जाण्याची तयारी आहे.
-प्रियंका संग्राम पाटील, पाचगाव सरपंच
- हद्दवाढ विरोधात ठराव देणार
जिल्हा परिषदेकडून हद्दवाढबाबत प्रस्ताव आल्यास विरोधाचाच ठराव देणार आहे. शहराची दूर्दशा झाली असताना गावाची अवस्था तशीच होणार आहे. प्राधीकरणाच्या माध्यमातून विकास झाला असता तर गाव स्वत:हून शहरात सहभागी झाली असती.
-शुंभागी किरण अडसूळ, सरनोबतवाडी सरपंच
- हद्दवाढ कृती समिताचे आज शहरात उपोषण
1946 पासून व नंतर कोल्हापूर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आपल्या कोल्हापूर शहराची हद्ददवाढ झालेली नाही. त्यासाठी कोल्हापूरकर सातत्याने या विषयी लढा देत आहोत. प्रत्येक वेळी शासन सकारात्मक आहे. या पलिकडे आपण काहीही यश प्राप्त करू शकलो नाही. आत्तासुद्धा तीच परिस्थिती आहे व महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व महानगरपालिकांची निवडणुका लक्षात घेता, आपल्याकडे अत्यंत कमी वेळ आहे. म्हणून शासनाची व प्रशासनाची या विषयाकडे लक्ष वेधण्याकरीता व 15 जुलै पुर्वी हद्दवाढीचा आदेश मिळविण्याकरीता, गुरुवारी (दि.3) सकाळी 10.00 ते 1.00 या वेळेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या दरवाज्यात लाक्षणिक उपोषण आयोजित केले आहे. तरी आपण, कुटुंब व मित्रपरिवारासहीत यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आर. के. पोवार, सचिन चव्हाण, रविकिरण इंगवले, सुजित चव्हाण महेश जाधव, बाबा पार्टे संदीप देसाई, अशोक भंडारे, राजू जाधव, अॅड. बाबा इंदुलकर, अॅड. अनिल घाटगे, दिलीप देसाई, सुशिल भांदिगरे, बाबुराव कदम, संभाजीराव जगदाळे, काका जाधव सौ. पद्मावती पाटील यांनी केले आहे.