त्या बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा.. !
बारावीच्या हॉल तिकीटामध्ये चूक
विमला गोयंका हायस्कूल वर कारवाई होणार
राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती
कोल्हापूर
कोल्हापूरातील विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शनिवारी (दि.८) रोजी एक प्रकार निदर्शनास आला. या शाळेने शनिवारीच बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट दिले. यामध्ये पालकांनी १२ वी च्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जेव्हा पाहीले, तेव्हा यावर नमूद केलेले विषय हे भूगोल आणि मराठी हे होते. प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना कॉम्प्युटर सायन्स किंवा क्रॉप सायन्स हे विषय असतील असे सांगण्यात आले होते. हे दोन्ही विषय हे २०० मार्कांचे आहेत. कॉम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स हे मराठी आणि भूगोल या विषयासाठी पर्यायी विषय असतात.
यानुसार संबंधित विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सायन्स किंवा क्रॉप सायन्सचा अभ्यास केला. पण प्रत्यक्षात या कनिष्ठ महाविद्यालयाला कॉम्प्युटर सायन्स किंवा क्रॉप सायन्सची मान्यताही नव्हती. किंवा महाविद्यालयाकडून कोणतीही मान्यता घेतलेली नाही. परंतु त्यांनी मुलांचे परीक्षा अर्जातही भूगोल आणि मराठी हेच विषय लिहीले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नंतर लक्षात आले, की आपल्याला कॉम्प्युटर सायन्स किंवा क्रॉप सायन्स हे विषय देता येणार नाहीत तर मराठी आणि भूगोल या विषयाची परिक्षा द्यावी लागेल. त्यानंतर पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. पोलिस यंत्रणेला पाचारण करण्यात आले.
यानंतर पालक व इतर उपस्थितांनी राज्य शिक्षण मंडळाशी संपर्क साधला. यानंतर संस्थेने विभागीय राज्य मंडळाशी संपर्क साधत असे सांगितले की, आमच्याकडून अशी चूक झालेली आहे. आम्ही पालकांना कॉम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स हे विषय आहेत असे सांगितले होते. पण प्रत्यक्षात आमच्याकडे मान्यता नाही.
विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेता राज्य मंडळाने असे आदेश दिले आहेत की, विद्यार्थ्यांनी ज्या विषयाचा अभ्यास केला होता. त्या विषयाचे हॉल तिकीट त्यांना देण्यात यावे. आणि संबंधित विद्यार्थ्यांची या विषयाची प्रॅक्टीकलची परीक्षा ही अधिकृत मान्यता असणाऱ्या महाविद्यालयातून पुन्हा घेण्यात यावी. ही परीक्षा या दोन दिवसात किंवा नंतर १३, १५, १७ मार्च ला आऊट ऑफ टर्न परीक्षा घेण्यात येणार आहेत. या सगळ्या प्रसंगातून विद्यार्थी सुखरुप बाहेर पडतील. परंतु असे प्रकार परत घडू नयेत यासाठी संबंधित संस्थेची चौकशी करुन त्यांच्या कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.