Solapur News : सोलापूर रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय; विशेष गाड्यांना मुदतवाढ
सोलापूर–अजमेर साप्ताहिक विशेष रेल्वेला मुदतवाढ
सोलापूर : सोलापूर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रबासी व भाविकांसाठी दिलासादायक निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अजमेर तसेच तिरुपती-पंढरपूर मार्गावरील साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांना फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी, सण-उत्सव तसेच धार्मिक यात्रांचा बाढता ओघ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूरला थेट उत्तर भारताशी जोडणारी अजमेर-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी ४ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत एकूण चार फेऱ्या धावणार आहे. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासासाठी सोलापूर-अजमेर साप्ताहिक विशेष गाडी पाच ते २६ फेब्रुवारी याकालावधीत चार फ्रेयांसाठी वाढविण्यात आली आहे. या गाड्यांमुळे राजस्थानकडे जाणाऱ्या तसेच तेथून येण्नया सोलापूर व मराठवाडा परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्र तिरुपती आणि महाराष्ट्राचे श्रद्धास्थान पंढरपूर यांना जोडणाऱ्या विशेष गाड्यांच्याही फ्रेयांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तिरुपती-पंढरपूर साप्ताहिक विशेष गाडी सात ते २८ फेब्रुवारी या कालावधीत चार फ्रेया धावणार आहेत. तर पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी ८ ते १ मार्च या कालावधीत चार फ्रेयांसाठी वाढविण्यात आली आहे. माघ व फाल्गुन महिन्यातील भाविकांची गर्दी लक्षात घेता या निर्णयाचा हजारो वारकरी व भाविकांना लाभ होणार आहे. या सर्व वाढीव विशेष गाड्यांचे आरक्षण स्पेशल शुल्कासह सुरू करण्यात आले आहे.