For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुलैमध्ये तब्बल 82.75 इंच विक्रमी पाऊस

11:26 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
जुलैमध्ये तब्बल 82 75 इंच विक्रमी पाऊस
Advertisement

आतापर्यंत 118 इंच, वाळपईत सर्वाधिक 146.72 इंच, द्विशतकाच्या दिशेने वाटचाल

Advertisement

पणजी : जुलैमध्ये तब्बल 82.75 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद राज्यात झाली असून यंदाचा विक्रमी पाऊस जुलैच्या अखेरच्या दिवशी 118 इंचापर्यंत जाऊन पोहोचला. यंदाचा पाऊस द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करणारा असावा, असे चित्र दिसून येते. शेवटच्या दिवशी 3 इंच पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासांमध्ये पावसाने राज्याला झोडपून काढले. आगामी 4 दिवसांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या 24 तासांमध्ये मान्सून आक्रमक झाला. विशेषत: रात्री उशिरा पावसाने सर्व ठिकाणी जोर धरला. पेडणेमध्ये सर्वाधिक 5.75 इंच, म्हापसा 2 इंच, फोंडा 4.50 इंच, पणजी 1.50 इंच, सांखळी 4 इंच, वाळपई 5.50 इंच, काणकोण 1.50 इंच, दाबोळी 1.50 इंच, मडगाव 4 इंच, केपे 4 इंच, सांगे 4.50 इंच अशी नोंद झाली.

गत 50 वर्षातील सर्वाधिक 

Advertisement

दरम्यान, जुलै महिन्यात पावसाने कहरच केला. महिनाभरात 82.75 इंच पावसाची विक्रमी नोंद केली. गेल्या 50 वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. जुलैच्या 13 तारीखपासून 19 जुलैपर्यंत 7 दिवसांत विक्रमी 42.50 इंच पावसाची नोंद झाली. म्हणजेच दिवसाकाठी सरासरी 6 इंच एवढी पावसाची नोंद झाली. जूनमध्ये एकूण 35.50 इंच एवढा पाऊस पडला. यावर्षी पाऊस द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. वाळपईमध्ये लवकरच पाऊस इंचाचे दीड शतक पूर्ण करणार आहे. आतापर्यंत तिथे 146.72 इंच पावसाची नोंद झालेली आहे.

Advertisement
Tags :

.