For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनजागृतीमुळेच युवा मतदारांची विक्रमी नोंद

10:30 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनजागृतीमुळेच युवा मतदारांची विक्रमी नोंद
Advertisement

जिल्ह्यात 10 लाख 8 हजार 596 युवा मतदार : नोंदणीसाठी 9 एप्रिलपर्यंत मुदत

Advertisement

बेळगाव : मतदानाचा टक्का वाढविण्याबरोबरच नवीन मतदारांची नोंद करून घेण्यासाठी निवडणूक विभागाकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे यंदा युवा मतदारांची नोंद अधिक झाली असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये 16 मार्चपर्यंत 10 लाख 8 हजार 596 युवा मतदारांची नोंद झाली आहे. नोंदणीसाठी 9 एप्रिलपर्यंत सोय ठेवण्यात आली आहे. त्यामुळे युवा मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी मतदारांची नोंद घेतली जात आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवा मतदारांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे. त्यांची नोंद करून घेऊन मतदान ओळखपत्र देण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी निवडणूक विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. युवा मतदारांच्या नोंदणीसाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये जागृती करून अर्ज भरून घेण्यात आले होते. यामुळेच युवा मतदारांची नोंद अधिक झाली असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

मतदानाचा अधिकार प्रामाणिकपणे बजावा

Advertisement

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. तो अधिकार प्रत्येकाने प्रामाणिकपणे बजावावा. मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून जागृती करण्यात येत आहे. तर युवा मतदारांना मतदान प्रक्रियेत आणण्यासाठी महाविद्यालयांमध्ये जागृती मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्याने नोंदणी केलेल्या अथवा दुरुस्ती केलेल्या मतदारांना घरपोच मतदान ओळखपत्र देण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. देण्यात येणारे मतदान ओळखपत्र अत्याधुनिक स्वरुपातील आहे. बेळगाव तालुक्यामध्ये 1300 पेक्षा अधिक मतदारांना पोस्टद्वारे ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर बेळगाव शहरामध्ये 13 हजारांपेक्षा अधिक जणांना नवीन ओळखपत्र देण्यात येत आहे. सदर ओळखपत्र पोस्टच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

नवीन मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

निवडणूक विभागाकडून यापूर्वीपासूनच पूर्ण तयारी करण्यात आली आहे. मतदान केंद्रे निश्चित करून मतदानासाठी जागृती करण्यात आली आहे. तर नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठीही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.

- ए. डी. अमरावदगी,निवडणूक विभाग तहसीलदार

जिल्ह्यात 1259 शतायुषी मतदार : जिल्ह्यात इच्छुकांची चाचपणी अद्याप सुरू

लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने वातावरण तापू लागले आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात इच्छुकांची चाचपणी अद्याप सुरू आहे. जिल्ह्यात 1259 शतायुषी मतदार आहेत. त्यामुळे शंभरी गाठलेल्या मतदारांना चांगला खासदार निवडण्याची संधी आहे. जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी कुडची मतदारसंघात 196 शंभरी पार केलेले मतदार आहेत. त्यामुळे कुडची मतदारसंघ शतायुषी मतदारांमध्ये आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ रायबाग विधानसभा मतदारसंघात 176, बेळगाव दक्षिण 116, कागवाड 108, अरभावी 97, बेळगाव ग्रामीण 83, बेळगाव उत्तर 79, गोकाक 73, रामदुर्ग 56, यमकनमर्डी 50, हुक्केरी आणि चिकोडी-सदलगा प्रत्येकी 45 शतायुषी मतदार आहेत. बेळगाव जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठी आहे. या मतदारांना घरबसल्या मतदानाची व्यवस्था केली आहे. त्याबरोबर बैलहोंगल मतदारसंघात 40, कित्तूर 27, सौंदत्ती 25, निपाणी 16, खानापूर 15, अथणी 12 शतायुषी मतदार आहेत. जिल्ह्यात 90 ते 99 वयोगटातील 17,119, 70 ते 79 वयोगटातील 2 लाख 31 हजार 628 मतदारांची संख्या आहे. 110 वर्षे उलटलेल्या मतदारांची संख्याही अधिक आहे. यंदा 1 लाख 70 हजार 41 नवमतदार आहेत. त्यामध्ये 58 हजार 783 युवक तर 48 हजार 242 युवतींचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.