सातार्डा- भोमवाडीत घरात आढळला कवड्या साप
सातार्डा -
सातार्डा - भोमवाडी येथील डॉ रवींद्रनाथ रेडकर यांच्या घरातील खोलीमध्ये कवड्या साप आढळून आला. डॉ रेडकर सर्प अभ्यासक असून कवड्या साप बिनविषारी असल्याचे त्यांनी सांगितले. कवड्या सापाला पकडून डॉ रेडकर यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले. घरात साप दिसून आलातर सापाला मारू नका सर्पमित्रांशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ रेडकर यांनी केले आहे.काळसर रंगाचा कवड्या साप साधारण एक फूट लांबीचा होता.या सापाची अधिकतम लांबी 2 फूट 7 इंच असते.काळसर तपकिरी किंवा काळ्या अंगाच्या मानेजवळ रुंद पांढरा पट्टा असतो. बाकी अंगावर पांढरे पट्टे असतात ते शेपटीकडे फिकट होत जातात.मानेपेक्षा वेगळे दिसणारे चपटे व रुंद डोके असते.कवड्या सापाच्या अंगावर चकाकी असते.कवड्या साप प्रजातीची मादी मार्च ते मे महिन्यामध्ये 4 ते 12 अंडी घालते.कवड्या साप मुख्यत: पाली, सापसुरळी, बेडूक खातो.भारत देशात काश्मीर वगळता कवड्या साप सर्व ठिकाणी आढळतो. विशेषतः हा मनुष्यवस्तीच्या आसपास,जुन्या पडक्या घरात किंवा दगड, मातीच्या ढिगाऱ्यामध्ये कवड्या साप वास्तव्य करतो.निशाचर,पाल हे प्रमुख खाद्य असल्याने कवड्या साप उभ्या भिंती चढू शकतो.