For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

30 वर्षांनी थायलंडमध्ये दिसले दुर्लभ मांजर

06:26 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
30 वर्षांनी थायलंडमध्ये दिसले दुर्लभ मांजर
Advertisement

लुप्त मानली गेली होती प्रजाती

Advertisement

थायलंडमध्ये एक असे दुर्लभ रानमांजर दिसून आले आहे, जे सुमारे 30 वर्षांपासून विलुप्त मानले जात होते. हे मांजर फ्लॅट-हेडेड कॅट म्हणून ओळखले जाते, जे जगातील सर्वात दुर्लभ आणि धोक्यात सापडलेल्या मांजरांपैकी एक आहे. थायलंडच्या संरक्षण विभाग आणि पँथेरा नावाच्या एनजीओने या मांजराच्या अस्तित्वाची माहिती दिली.

थायलंडमध्ये हे मांजर यापूर्वी 1995 मध्ये अखेरचे दिसून आले होते. त्यानंतर त्याच्या अस्तित्वाचा कुठलाच पुरावा मिळाला नव्हता, यामुळे त्याला विलुप्त मानण्यात आले होते. पण मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात दक्षिण थायलंडच्या प्रिंसेस सिरिंधोर्न वाइल्डलाइफ सँक्च्युरीमध्ये कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले, यात फ्लॅट-हेडेड कॅटची 29 वेळा छायाचित्रे आणि व्हिडिओ कैद झाले आहेत.

Advertisement

सर्वेक्षणात एक मांजर स्वत:च्या पिल्लासोबत दिसली, हा एक अत्यंत चांगला संकेत आहे. कारण ही प्रजाती एकावेळी केवळ एकाच पिल्लाला जन्म देऊ शकते.

या मांजराचे वैशिष्ट्या..

? आकारात पाळीव मांजराइतके

? रात्री सक्रीय राहते अन् बहुतांश वेळ लपून राहते

? त्या ठिकाणी पोहोचणे वैज्ञानिकांसाठी अत्यंत अवघड

? डोकं चपट्या आकाराचे, डोळे गोल अन् अत्यंत जवळ

? दलदलयुक्त जंगल अन् गोड्या पाण्याच्या मँग्रूवमध्ये राहणे पसंत

धोक्यात का आहे हे मांजर

जगभरात केवळ सुमारे 2500 प्रौढ फ्लॅट-हेडेड कॅट शिल्लक आहे, याचमुळे आययूसीएनने याला ‘एंडेजर्ड’ घोषित पेले आहे. थायलंडमध्ये या प्राण्याला धोका हा प्रामुख्याने खालील गोष्टींपासून आहे.

-पाळीव प्राण्यांमुळे आजार फैलावणे

-विविध भागांमध्ये प्रजनन अवघड ठरणे

-जंगलतोड आणि शेतीसाठी जमिनीचे रुपांतरण

-दलदलयुक्त भाग विभागले गेल्याने प्रजातीला फटका

या मांजराचे अस्तित्व पुन्हा दिसून येणे अत्यंत आनंदाची बाब आहे, परंतु चिंताही आहे. याचा अधिवास अत्यंत विभागला गेला आहे असे उद्गार कासेटसार्ट विद्यापीठाचे वैज्ञानिक डॉ. कासेट सुताशा यांनी काढले आहेत.

पँथेरा संरक्षण कार्यक्रमाचे व्यवस्थापक रत्तपन पत्तनारंगसन यांनी मोठ्या प्रमाणात हा प्राणी दिसून आल्याने या भागात त्यांची चांगली संख्या असावी, परंतु अचूक गणना करणे अवघड आहे, कारण त्यांच्या शरीरावर वेगळी ओळखयुक्त खुणा नसतात असे म्हटले आहे. हा शोध केवळ एक सुरुवात आहे. आता या मांजरांना माणसांसोबत सुरक्षित आणि स्थायी पद्धतीने राहण्यायोग्य वातावरण निर्माण करण्याचे आव्हान आहे. जंगलांचे रक्षण, दलदलयुक्त भागांना वाचविणे आणि आजारांपासून सुरक्षा आवश्यक असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

‘अॅनिमल पार्क’मध्ये दिसणार सलोनी बत्रा

रणवीर कपूरचा ऑलटाइम ब्लॉकबस्टर चित्रपट ‘अॅनिमल’ हा अत्यंत यशस्वी ठरला होता. निर्मात्यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची ‘अॅनिमल पार्क’ची घोषणा यापूर्वीच केली आहे. आता चित्रपटाशी निगडित एका अभिनेत्रीने ‘अॅनिमल पार्क’मधील स्वत:च्या भूमिकेची पुष्टी केली आहे.

‘अॅनिमल’ चित्रपटात रणवीर कपूरच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारलेली अभिनेत्री सलोनी बत्रा ही अलिकडेच ‘भय’ सीरिजमध्ये दिसून आली आहे. सलोनीने आता ‘अॅनिमल पार्क’चा हिस्सा असल्याची पुष्टी दिली आहे. ‘अॅनिमल’ हा चित्रपट लोकांना पसंत पडला होता, याचमुळे निर्माते आता अशाप्रकारचे चित्रपट निर्माण करू पाहत आहेत. हे बॉक्स ऑफिस आणि आमच्यासाठीही चांगले असल्याचे सलोनीने म्हटले आहे. मी कधीच अभिनेत्री होऊ इच्छित नव्हते. माझी पार्श्वभूमी डिझाइन क्षेत्राची आहे. परंतु जेव्हा मी काम करते, तेव्हा नेहमीच सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करते. कारकीर्दीत पुढे जात राहण्याची माझी इच्छा आहे. बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करणे अवघड असले तरीही प्रयत्न करणे माझ्या हाती असल्याचे सलोनीने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.