धबधब्यात तयार होते इंद्रधनुष्य
हवाईमध्ये एक असा धबधबा आहे, जेथे आकाशात नव्हे तर धबधब्यातच पूर्ण इंद्रधनुष्य तयार होते. याचे नाव रेनबो फॉल्स असून लोक त्याला रेनबो वॉटरफॉलही म्हणतात. हे अनोखे दृश्य अमेरिकेच्या हवाई बेटाच्या बिग आयलँडवरील हिलो शहरानजीक दिसते. दररोज सकाळी सूर्य उगवताच त्याची किरणे 80 फूट उंच या धबधब्याच्या प्रवाहावर पडतात, तेव्हा तेथे 7 रंगांचा पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य तयार होते. हे दृश्य इतके सुंदर आणि दुर्लभ आहे की, जगभरातील फोटोग्राफर आणि पर्यटक सकाळी 7 वाजल्यापासूनच कॅमेरे घेऊन रांगा लावत असतात. वाइलुकु नदीतून कोसळणारा हा धबधबा हिलो शहरापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे.
80 फूट उंचीवर पाणी जेव्हा खडकांना कोसळते, तेव्हा हवेत लाखो छोटे छोटे थेंब उडतात, यांच थेंबांमध्ये सूर्याची किरणे तुटतात आणि पूर्ण स्पेक्ट्रम धबधब्यात चमकू लागतो. इंद्रधनुष्य केवळ सकाळी 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंतच दिसते. कारण याचसमयी सूर्याची स्थिती त्याकरता योग्य असते. दुपार होताच कोन बदलतो आणि जादू गायब होते. जुन्या काळात हवाईचे लोक याला पवित्र मानत होते. धबधब्याच्या आत निर्मित गुहेत देवी हिना राहते अशी मान्यता होती. देवी हिना हिला इंद्रधनुष्याची आई मानली जाते, याचमुळे धबधब्याचे मूळ नाव ‘वायआनुएनुए’ आहे, याचा अर्थ ‘दरवेळी फिरणारे पाणी’ असा होतो. परंतु आता जग याला केवळ रेनबो फॉल्स नावाने ओळखते.
अत्यंत खास प्रवाह
या धबधब्याचे वैशिष्ट्या म्हणजे पावसाळ्यात याचा प्रवाह वाढतो आणि इंद्रधनुष्य आणखी मोठे दिसू लागते. अनेकदा दुहेरी इंद्रधनुष्य तयार होते. हिलो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे दृश्य 10 मिनिटांच्या ड्राइव्हवर आहे. येथे पार्किंग अन् प्रवेश मोफत असून दोन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत.