ए. आर. रहमान रुग्णालयातून सुखरुप परतले
संगीतकार रहमान यांची प्रकृती स्थिर: प्रकृतीत बिघड झाल्याने रुग्णालयात केले होते दाखल
चेन्नई
संगीतकार आणि गायक ए आर रहमान यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीटीआयनुसार, ए आर रहमान यांच्या छातीत अचानक दुखु लागले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. ए. आर. रहमान हे परदेशातून परतल्यानंतर त्यांना मानदुखीचा त्रास होऊ लागला त्यानंतर त्यांना छातीत दुखू लागले.
त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते घरात सुखरूप परतले आहेत. त्यांचा घसा खवखवत होता आणि त्यांना डिहायड्रेशन झाले होते. म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशी माहिती रहमान यांच्या टीमने दिली.
मुख्यमंत्र्यांनीही केली तब्येतीची विचारपूस
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ए. आर. रहमान यांच्या तब्येतीची फोनद्वारे विचारपूस केली. त्यांनी आपल्या "एक्स" वरील अकाऊंटवर लिहीले आहे, की 'जसे मला समजले की रहमान यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तसे मी डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. यावेळी डॉक्टर म्हणाले, की ते लवकरच बरे होऊन घरी परततील'.