For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नागिरीत ‘टेस्ला’ सारखा प्रकल्प आणणार

01:09 PM Mar 09, 2025 IST | Radhika Patil
रत्नागिरीत ‘टेस्ला’ सारखा प्रकल्प आणणार
Advertisement

रत्नागिरी : 

Advertisement

कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी हे मुंबईनंतर रेल्वे, विमान, जल व रस्ते अशा चारही वाहतुकीच्या सुविधा असणारे एकमेव ठिकाण आहे. यासाठीच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून टेस्लासारखा इलेक्ट्रीकल व्हेईकल निर्मितीचा कारखाना जिह्यात आणण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही आपल्याला पाठिंबा दर्शवला असल्याने हा प्रकल्प जिह्यात आणण्यात आपल्याला निश्चित यश येईल. टेस्लासारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आल्यास जिह्याचा कायापालट होईल, असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी येथे व्यक्त केला.

मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी असल्याने आमदार सामंत शनिवारी रत्नागिरी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईनंतर रत्नागिरी हे एकमेव शहर आहे जेथे लवकरच क्रुझ टर्मिनल होणार आहे. विमानतळही वर्षभरात मार्गी लागेल. ग्रीन फिल्ड महामार्गामुळे टेस्लासारखा प्रकल्प आल्यास रत्नागिरी जिल्हा ऑटोमोबाईल हब होऊ शकतो. रत्नागिरीतच अशा प्रकारचा उद्योग उभारण्याची सर्वांची खात्री झाल्यामुळे हा प्रकल्प जिह्यात आणण्यात आपल्याला निश्चित यश येईल, असे सामंत म्हणाले.

Advertisement

  • रोजगार निर्मिती आवश्यक

जिह्यासह लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येथे रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे. मागील अनेक वर्ष हा मतदारसंघ मागास राहिला आहे. सह्याद्रीच्या टोकापासून अगदी अरबी समुद्रापर्यंत हा विधानसभा मतदारसंघ पसरला आहे. पाणी, शिक्षण, आरोग्य या येथील प्रमुख समस्या असून आपण रोजगार निर्मितीवरही भर देणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात पाण्याचा मोठा प्रश्न निवडणुकीदरम्यान ग्रामस्थांनी कानावर घातला. पुढील दोन ते तीन वर्षात येथील पाणीप्रश्न सोडवण्याबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर आपला भर राहणार आहे. उपजिल्हा ऊग्णालये, ग्रामीण ऊग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ओणी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल लवकर सुरू व्हावे म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या किनारपट्टी भागात भूमीगत वीजवाहिनी टाकण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून 231 कोटी ऊपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर या मतदारसंघाचा 423 कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्यात यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून लांजा, राजापूर, देवरुख, रत्नागिरी या बस आगारांना प्रत्येकी 10 बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी लांजा 2, राजापूर 5, रत्नागिरी 10 अशा 17 बसेस प्राप्त झाल्या असून त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

  • राजापूरला ‘मॉडेल मतदारसंघ’ बनवणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघासाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात आली आहे. सुमारे 1 हजार कोटीहून अधिकचा निधी लागणार आहे. राज्यात 288 मतदार संघ आहेत. राजापूर मतदार संघ ‘मॉडेल मतदारसंघ’ बनावा यासाठी आपले प्रयत्न आहेत. मतदारसंघातील रस्ते, साकव, पूल व अन्य कामांसाठी सुमारे 400 कोटीहून अधिकचा प्रस्ताव दिल्याचेही सामंत यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.