आरवली वेतोबा देवस्थान समोरील रस्त्यावर मध्यभागी खड्डा
रस्ता बनलाय धोकादायक
वेंगुर्ले (वार्ताहर)-
आरवली येथील सुप्रसिध्द असलेल्या श्रीदेव वेतोबा देवस्थान समोरील रस्त्यावर पाणी निचरा होण्यासाठी घालण्यात आलेल्या मोरीच्या ठिकाणी रस्त्याच्या ठिकाणी मध्यभागी भला मोठा होल (खड्डा) पडला आहे. त्यामुळे वाहनांचे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. सदरचा होल सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरीत बुजवून होणाऱ्या अपघातांचा अनर्थ टाळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा आरवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मयुर आरोलकर यांनी केली आहे.गेल्या तीन दिवसांपासून आरवली येथील श्री देव वेतोबा मंदिर समोरील रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी एक भला मोठा होल (खड्डा) पडलेला आहे. या होलमध्ये दुचारी किंवा तीन चाकी गाड्यांची चाके रूतून अपघात होऊन अनर्थ घडण्याची शक्यता आहे. सदर रस्त्यास होल पडलेला आहे हे चालकांच्या लक्षात येण्यासाठी झावळ त्याखड्यात रोवून कुणीतरी ठेवले गेलेले आहे. वेळीच तो खड्डा भरून रस्ता वाहातुकिस सुव्यवस्थित न केल्यास अपघात होऊन प्रवासी व चालकांवर जिवीतहानीचा प्रसंग निर्माण होणारा आहे.त्यामुळे सदर रस्त्यावरील होल सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरीत बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा. अशी मागणी आरवलीतील सामाजिक कार्यकर्ते तथा आरवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मयुर आरोलकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधले आहे.