For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खांडोळा महाविद्यालयाला ‘ए प्लस’ मानांकन

12:01 PM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
खांडोळा महाविद्यालयाला ‘ए प्लस’ मानांकन
Advertisement

गोमंतकीयांसाठी कौतुकास्पद बाब : मुख्यमंत्री

Advertisement

वार्ताहर /माशेल

राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) खांडोळा येथील सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला 3.43 गुणांसह ‘ए प्लस’ मानांकन प्राप्त झाले आहे. गोव्यात हे मानांकन प्राप्त करणारे पहिलेच महाविद्यालय ठरले आहे. सरकारी महाविद्यालयाच्या या कामगिरीबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले असून गोमंतकीयांसाठी ही कौतुकास्पद बाब असल्याची प्रतिक्रया त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

एक प्रतिष्ठित म्हणून ओळख असलेल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा कठोर परिश्रमाचा आणि समर्पणाचा पुरावा आहे. प्रा. डॉ. पूर्णकला सामंत आणि आयक्यू. डी. संचालक डॉ. डिलेक्टा डिकॉस्ता यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने केलेल्या कामगिरीमुळे हे यश प्राप्त झालेले आहे. महाविद्यालयाने एनआयआरएफएफ 101 ते 150 श्रेणीमध्ये सलग पाच वर्षे स्थान प्राप्त केले आहे. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्रे, कार्यशाळा व इतर शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. या यशामुळे महाविद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

 यापुढेही महाविद्यालयाच्या कामगिरीत सातत्य राहील !

खांडोळा महाविद्यालयाला नॅक यांच्याकडून ‘ए प्लस’ मानांकन मिळाल्याने महाविद्यालयाचे कर्मचारी आणि विद्यार्थीही कौतुकास पात्र आहेत. गोव्यासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. शैक्षणिक सुविधांसह सर्व सोयी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याने ही मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यापुढेही खांडोळा महाविद्यालय आपले वातावरण पोषक ठेवणार असून गुणवंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.