For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

100 वर्षांत एकदाच फुलणारे रोप

06:10 AM Jul 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
100 वर्षांत एकदाच फुलणारे रोप
Advertisement

निसर्गात असे वृक्ष अन् रोपं आहेत, जी अत्यंत अनोखी आहेत. असेच एका रोप 100 वर्षांमध्ये एकच फुलते. या रोपाचे नाव पुया रायमेंडी असून हे अत्यंत दुर्लभ अन् विशाल रोप आहे. हे 100 वर्षांमध्ये एकाच फुलत असते. याचमुळे लोकांना हे पाहण्याची संधी आयुष्यात केवळ एकदाच अन् ती देखील अत्यंत कमी स्वरुपात मिळाले. या रोपाला अँडीजची राणी म्हणूनही ओळखले जाते.

Advertisement

या रोपाचे वय 80 ते 100 वर्षांपर्यंत पोहोचल्यावरच याला फुल येते. हे सर्वसाधारणपणे कॅक्ट्सशी मिळतेजुळते रोप आहे. पुया रायमोंडी हे दक्षिण अमेरिकत 12000 फुटांच्या उंचीवर आढळून येत. हे रोप खराब मातीसोबत थंड अन् कोरड्या हवामानातही उगवू शकते. पुया रायमोंडी जगाचे सर्वात मोठे ब्रोमेलियाड आहे. याला जगातील सर्वात उंच फ्लॉवर स्पाइकही म्हटले जाते.

पुया रायमोंडी 33 फूटांच्या उंचीपर्यंत वाढू शकते. याच्यावर फुल उमगल्यावर हे पाहण्यास अत्यंत सुंदर वाटते. या रोपावर पांढऱ्या रंगाचे फुल येते आणि पूर्ण रोप फुलांनी भरून जाते. एकदा यात फुल आल्यावर हे रोप मरून जाते.

Advertisement

Advertisement
Tags :

.