For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

5 नद्यांचा संगम होणारे ठिकाण

06:33 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
5 नद्यांचा संगम होणारे ठिकाण
Advertisement

उत्तरप्रदेशच्या जालौनचे अनोखे वैशिष्ट्या

Advertisement

भारताच्या उत्तरप्रदेशात एक असे ठिकाण आहे, जेथे 5 नद्यांचा संगम होतो. 5 नद्यांचा संगम होणारे हे जगातील एकमेव ठिकाण आहे. याला अत्यंत पवित्र स्थान मानले जाते, ज्याला महा तीर्थराज देखील म्हटले जाते.

जालौन जिल्ह्यात पंचनद येथे यमुना, चंबळ, सिंध, पहुज आणि कुंवारी नद्यांचा संगम होतो. या स्थानाचे ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. याच ठिकाणी महाभारत काळात अज्ञातवासादरम्यान पांडवांनी वास्तव्य केले होते असे सांगण्यात येते. संगमानजीकच मुचकुंद महाराजांचे मंदिर देखील आहे.

Advertisement

पंचनद तीर्थमध्ये चंबळ, सिंध, कुंवारी आणि पहुज नद्या यमुना नदीत सामावून जातात. या स्थानाशी जालौन, इटावा आणि औरेयाच्या भौगोलिक सीमा जोडल्या गेलेल्या आहेत. मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्याचा काहीसा भूभागही देखील याच भागात मोडतो, प्राचीन हिंदू पुराणांमध्ये देखील पंचनदचा उल्लेख आढळून येतो.

श्रीमद् देवी भागवत पुराणाच्या पंचम स्कंधाच्या अध्यायात श्लोकाच्या माध्यमातून पंचनदाचा उल्लेख करण्यात आला आहे. या स्थानाशी निगडित पौरोणिक कथेनुसार महिषासुराचा पिता रंभ तसेच काका करंभने पुत्रप्राप्तीसाठी पंचनद येथे तपस्या केली होती.

महाभारतातही पंचनदचा उल्लेख करण्यात आला आहे. कथेनुसार महाभारत युद्ध संपुष्टात आल्यावर पांडु पुत्र नकुलने पंचनद क्षेत्रावर आक्रमण करत विजय प्राप्त केला होता. विष्णु पुराणातही पंचनदचा तपशील आहे. पंचनंद तीर्थक्षेत्रात कालेश्वर महादेवाचे मंदिर देखील आहे.

Advertisement
Tags :

.