For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

चिनच्या वाळवंटात गुलाबी सरोवर

06:44 AM Oct 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
चिनच्या वाळवंटात गुलाबी सरोवर
Advertisement

वर्षभरात बदलतो रंग

Advertisement

चीनच्या इनर मंगोलियाच्या अल्शा लीगमध्ये एक असे सरोवर आहे, ज्याचे पाणी वर्षभर एकसारखे दिसत नाही. दागेतु सरोवर बदैन जारान वाळवंटात असून या भागातील 5 खास नैसर्गिक ठिकाणांमध्ये सामील आहे. हवामान बदलण्यासोबत याचे पाणी सौम्य गुलाबीपासून दाट लाल रंगांपर्यत दिसून येते. याचे मोठे कारण सरोवराच्या पाण्यातील अत्याधिक मीठ, खनिजे आणि खास प्रकारचे मायक्रोऑर्गेनिजम म्हणजेच अत्यंत सुक्ष्म जीव आहेत.

दागेतु सरोवराचे पाणी सामान्य गोड्या पाण्याच्या सरोवरापेक्षा अत्यंत वेगळे आहे. यात मीठाचे प्रमाण अधिक आहे आणि पाण्याची केमिस्ट्री देखील वेगळी आहे. अशा ठिकाणी काही खास मायक्रोऑर्गेनिजम सहजपणे राहू शकतात. जेव्हा त्यांची संख्या वाढते, तेव्हा त्यांनी तयार केलेल्या पिगमेंटमुळे पाणी गुलाबी किंवा लाल रंगाचे दिसू लागते.

Advertisement

 

सरोवरावर झालेल्या वैज्ञानिक संशोधनात हवामानासोबत पाणी आणि त्यातील गोष्टींमध्ये होणारे बदल पाहिले गेले. संशोधनानुसार उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर काही खास मायक्रोऑर्गेनिजम वेगाने वाढतात, यात काही असे जीव देखील असतात, जे लाल किंवा गुलाबी रंगयुक्त पिगमेंट तयार करतात. याचमुळे उन्हाळ्यात सरोवराचा रंग लाल किंवा गुलाबी दिसून येऊ शकतो.

उन्हाळ्यात सरोवराचे पाणी तप्त होते, यादरम्यान मीठ आणि इतर खनिजांसोबत काही मायक्रोऑर्गेनिजमसाठी वातावरण अनुकूल ठरते. त्यांची संख्या वाढल्यावर पाण्याचा रंग बदलू लागतो. पाण्यातील छोटे जीव आणि त्यातील केमिकल्स मिळून हा बदल करतात. याचमुळे हवामान बदलल्यावर सरोवराचा रंगही बदलू शकतो.

पाणी कमी झाल्यावर वाढते मीठ

हवामान बदलल्यावर सरोवरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. पाणी कमी झाल्यावर त्यातील मीठ आणि इतर खनिजं अधिक दिसू लागतात. वैज्ञानिक संशोधनात सोडियम क्लोराइड म्हणजेच सामान्य मिठाचे क्रिस्ठल आणि हेमेटाइट नावाच्या खनिजाची उपस्थितीही मिळाली आहे. हेमेटाइटचा रंग लाल असतो. सरोवराच्या तळात जमा हे खनिज देखील पाणी अन् सरोवराच्या पृष्ठभागाच्या रंगावर प्रभाव पाडते. याचबरोबर पाण्याची बदलती स्थिती आणि मायक्रोऑर्गेनिजमच्या संख्येत बदलही रंगाला प्रभावित करते.

 

वाळवंटात अनेक सरोवरं

दागेतु सरोवर हे बदैन जारान वाळवंटात असून तेथे केवळ वाळूच्या टेकड्या असून त्यादरम्यान अनेक सरोवरं देखीलआहेत. युनेस्कोनुसार या भागात सुमारे 144 इंटरड्यूनल लेक्स म्हणजेच वाळूच्या टेकड्यांदरम्यान निर्मित सरोवरं आहेत. यातील बहुतांश सरोवरांचे पाणी खारे आहे. बदैन जारान वाळवंट उत्तरपश्चिम चीनच्या अलाशान पठारावर स्थित आहे. युनेस्कोनुसार हे चीनमधील तिसरे सर्वात मोठे वाळवंट आहे. येथे वाळूच्या टेकड्यांची उंची सुमारे 460 मीटरपर्यंत आहे.

युनेस्कोच्या यादीत समावेश

बदैन जारान वाळवंट-टॉवर्स ऑफ सँड अँड लेक्सला 2024 साली युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत सामील करण्यात आले. या भागाचे वैशिष्ट्या येथील वाळूच्या उंच टेकड्या आणि त्यादरम्यान असलेली सरोवरं आहे. दागेतु सरोवर देखील याच नैसर्गिक प्रणालीचा हिस्सा आहे. याचा रंग बदलणे कुठल्याही रहस्यमय घटनेमुळे घडत नाही. सरोवराच्या पाण्यात मीठाचे प्रमाण, खनिज, तापमान, मायक्रोऑर्गेनिजम आणि हवामानात होणारे बदल मिळून याच्या रंगाला प्रभावित करतात. याचमुळे हे सरोवर वेगवेगळ्या काळात गुलाबीपासून दाट लाल रंगापर्यंत दिसून येते.

Advertisement
Tags :

.