हजारो वर्षे जुन्या ममीच्या पोटात मिळाला कागद
खुलाशामुळे वैज्ञानिकही चकित
इजिप्तच्या अल-बहासामध्ये पुरातत्वतज्ञांना एक अशी ममी मिळाली आहे, ज्याने आतापर्यंतच्या सर्व मान्यता हादरवून टाकल्या आहेत. सर्वसाधारणपणे जेव्हा कुठलीही प्राचीन ममी मिळते, तेव्हा तिच्यासोबत जादुई मंत्र किंवा धार्मिक ग्रंथ आढळून येतात. याचबरोबर सोन्याचांदीचे दागिनेही प्राप्त व्हायचे. परंतु एका ममीच्या पोटाच्या आत प्राचीन कागद (पपायरस) मिळाला असून त्यावर जगातील सर्वात प्रसिद्ध युद्धकथांपैकी एकाचा हिस्सा लिहिला गेला होता.
तपासणीदरम्यान संशोधकांनी ममीच्या पोटात असलेला हा कागद प्रत्यक्षात महान कवी होमरची सुप्रसिद्ध रचना ‘इलियड’चा एक हिस्सा असल्याचे आढळून आले. यात प्राचीन यूनानी सैन्य आणि त्याच्या जहाजांचा विस्तृत तपशील आहे. पुरातत्वतज्ञांसाठी हा शोध एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. या शोधाने प्राचीन काळात मृतदेह दफन करण्याच्या परंपरांवर एका नव्या चर्चेला जन्म दिला आहे.
या रहस्यमय पपायरसला अलिकडेच करण्यात आलेल्या उत्खननादरम्यान बाहेर काढण्यात आले होते. वैज्ञानिकांच्या टीमला ग्रीकभाषेतील या कागदावरील मजुकराचे अध्ययन केल्यावर हजारो वर्षांनंतरही हा कागद सुरक्षित कसा राहिला याचेच आश्चर्य वाटत आहे. सर्वसाधारणपणे ममी तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान शरीराला रसायनांनी भरले जाते, परंतु या ममीला अनोख्या पद्धतीने दफन करण्यात आले होते.
ममीच्या आत कुठल्याही साहित्यिकाची कविता असणे हा त्या काळातील लोकांसाठी साहित्याचे महत्त्व केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हते असे संकेत देतो. पुरातत्वतज्ञांना याचबरोबर सोन्याची जीभ जोडण्यात आलेली ममीही मिळाली आहे. प्राचीन इजिप्तच्या लोकांचे सोन्याची जीभ लावल्याने मृत्यूनंतर मृत देवतांशी बोलू शकेल असे मानणे होते. याचबरोबर तेथे सजविण्यात आलेल्या शवपेटी आणि अनेक प्राचीन कलाकृती प्राप्त झाल्या आहेत. हे उत्खनन बार्सिलोना विद्यापीठाच्या नेतृत्वात करण्यात आले होते. कैरोपासून सुमारे 190 किलोमीटर अंतरावरील ऑक्सिरहिन्चस नावाच्या प्राचीन शहरात हे उत्खनन झाले आहे.