बेलाच्या पानावर साकारले महादेवाचे चित्र
04:20 PM Feb 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
महाशिवरात्रीचे औचित्य ; देवगड येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांची कलाकृती
Advertisement
सिंधुदुर्ग
देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी उद्या 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त बेलाच्या पानावर श्री देव महादेवाची कलाकृती साकारली असून त्यांच्या या कलाकृतीचे कौतुक होत आहे . या चित्राची उंची १ इंच असून लांबी 2 इंच आहे .एक्रोलिक रंगाचा वापर करून हे चित्र साकारले गेले असून संपूर्ण कलाकृती साकारण्यासाठी 20 मिनिटाचा कालावधी लागला असे चित्रकार मेस्त्री यांनी सांगितले . यापूर्वी अक्षय मेस्त्री यांनी शंक, दगडावर महाकाय अशी विविध चित्रे साकारली आहेत.
Advertisement
Advertisement