एका चित्राने मिळवून दिला फायदा
250 रुपयांमध्ये खरेदी केलेल्या चित्राला मोठी किंमत
अमेरिकेतील एका महिलेसोबत अजब प्रकार घडला आहे. या महिलेने एक चित्र केवळ 250 रुपयांमध्ये खरेदी केले होते. परंतु या महिलेला नंतर या चित्राची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे कळले. 27 वर्षीय मरीला एल्क्रॉन स्वत:चा जोडीदार एरॉन हेलीसोबत ओहिओच्या ऑकवुडमधील स्वत:च्या घरी जात असताना अचानक तिने एका चॅरिटी शॉपवर जाण्याचा निर्णय घेतल. तेथील दुकानमालकाने त्यांना अलिकडेच दाखल झालेली सामग्री दाखविली. त्यांना पाहून मरीसाला काही चित्रं पसंत पडली आणि तिने ती खरेदी केली.
पसंत केलेल्या सामग्रीत मरीसाला एक चित्र विशेष आवडले होते, हे चित्र तिने केवळ 2.9 डॉलर्स म्हणजेच 253 रुपयांमध्ये खरेदी केले. जेव्हा मी कारमध्ये बसत होते, तेव्हा चित्राच्या कोपऱ्यात कलाकाराचे नाव लिहिलेले असल्याचे दिसून आले. हे नाव जोहान बर्थेलसन यांचे होते. हा एखादा स्थानिक चित्रकार असावा असे वाटले होते असे मरीसाने सांगितले. परंतु मरीसाने हे नाव गुगल केले असता बर्थेलसन एक प्रसिद्ध चित्रकार असल्याचे तिला कळले. त्यांच्या चित्रांची किंमत दीड लाखापासून 31 लाख रुपयांपर्यंत असल्याचे कळल्यावर ती अवाक् झाली. यानंतर ती चित्रकामाचे जाणकार असलेल्या लोकांची भेट घेण्यास सुरुवात केली आणि फेसबुकवरील एका समुहाने या चित्राला अत्यंत पसंत केले.
मरीसाने स्वत:ची ही अनोखी कहाणी सोशल मीडियावर शेअर केली. तिच्या या पोस्टला हजारो ह्यूज मिळाल्या आहेत. मरीसाने सिनसिनाटीच्या काजा साइकेस आर्ट गॅलरीशी संपर्क साधला आणि त्यांनी चित्राची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगितले. तिने आता या चित्राचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मिळणारी रक्कम ती स्वत:च्या विवाहाकरता खर्च करणार आहे.