For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन किडनी असणारा व्यक्ती

06:14 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
तीन किडनी असणारा व्यक्ती
Advertisement

वयाच्या 64 व्या वर्षी खेळतो फुटबॉल

Advertisement

बुंदेलखंडच्या टीकमगढमध्ये एक निवृत्त पोलीस अधिकारी दोन नव्हे तर तीन किडनींचा मालक आहे. त्याच्या शरीरात उजव्या बाजूला दोन तर डाव्या बाजूला एक किडनी आहे. सुमारे 40 वर्षांपूर्वी त्यांना याविषयी समजले होते. कुठलीही विशेष आरोग्य समस्या नसल्याने ते वयाच्या 64 व्या वर्षी उत्तमप्रकारे जगत आहेत. खलील मोहम्मद हे आजही फुटबॉल खेळत असतात. तसेच त्यांनी स्वत:ची पोलीस अधिकाऱ्याची नोकरी कुठल्याही समस्येशिवाय पूर्ण केली आहे.

टीकमगढ येथील रहिवासी खलील मोहम्मद यांना बालपणापासूनच फुटबॉल खेळण्याची आवड राहिली आहे. परंतु कधीकधी खाली वाकताना किंवा वजन उचलताना त्यांना त्रास व्हायचा. 24 वर्षे वय असताना त्यांना कंबरदुखीची समस्या उद्भवली होती. यानंतर त्यांनी विविध ठिकाणी उपचार करवून घेतले होते. परंतु कुठलाच आराम मिळाला नव्हता.

Advertisement

अशा स्थितीत झाशी येथे जात त्यांनी पूर्ण वैद्यकीय तपासणी करवून घेतली होती. तेव्हा आयव्हीपी तपासणीत त्यांच्या शरीरात तीन किडनी असल्याचे स्पष्ट झाले होते. डॉक्टर देखील रिपोर्ट पाहून हैराण झाले होते. शरीरात तीन किडनी असल्याने त्रास होत असल्याचे निदान करण्यात आले होते.

नंतर किडनीच्या हिशेबानुसार अधिक पाणी पिऊ लागल्यावर त्रास कमी झाला. खाली वाकताना खबरदारी बाळगावी लागते. सर्वसामान्य लोक दिवसाकाठी 3-4 लिटर पाणी पित असतात. तर मला दररोज 6-7 लिटर पाणी प्यावे लागते असे खलील सांगतात.

Advertisement
Tags :

.