रजोगुणी मनुष्य विकारांच्या आहारी गेलेला असतो
अध्याय नववा
माणसाचा स्वभाव जसजसा सात्विक होत जाईल तसतसे तो ज्ञान आणि शांतीचा धनी होईल. त्यादृष्टीने आपण सत्व, रज आणि तम गुणांचा तौलनिक अभ्यास करत आहोत. सत्वगुणी मनुष्य ज्ञान आणि मन:शांती मिळवत असतो आणि त्याचा उपयोग त्याने ईश्वरप्राप्तीसाठी करावा अशी अपेक्षा असते. मात्र काही वेळा त्याला स्वत:च्या ज्ञानाचा आणि मन:शांतीमुळे मिळणाऱ्या सुखाचा अहंकार वाटू लागतो आणि त्यामुळे तो ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक ते ज्ञान आणि शांती बाळगत असूनसुद्धा ईश्वरापासून दूर जातो. रजोगुणी मनुष्य कसल्या ना कसल्या अपेक्षेने सतत काम करत असतो. त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे त्याच्या स्वभावातच नसते. म्हणून प्रत्येकाने निरपेक्ष राहून प्राप्त होणाऱ्या वस्तू, व्यक्ती वा परिस्थिती या तात्पुरत्या आहेत हे लक्षात घेऊन त्यासंबंधी आवश्यक ते कर्तव्य निरपेक्षतेनं करावं म्हणजे मन त्यात गुंतून राहणार नाही.
रज आणि तम गुणांची वैशिष्ट्यो सांगणारा लोभोऽ शमऽ स्पृहारम्भऽ कर्मणां रजसो गुण? ।
मोहोऽ प्रवृत्तिश्चाज्ञानं प्रमादस्तमसो गुणऽ ।। 32।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार लोभ, चित्त शान्त नसणे, इच्छा आणि कर्मारंभाची उत्सुकता असते तेव्हा रजोगुण अधिक असतो, तर मोह, अप्रवृत्ति, अज्ञान आणि प्रमाद असतात तेंव्हा तमोगुण अधिक असतो.
रजोगुण हा तिन्ही गुणात प्रभावी असतो कारण तो सर्व वासनांचे आणि उपभोगांच्या आसक्तीचे सार आहे. वासनांच्या आणि उपभोगांच्या आवडीमुळेच जगातील सर्व घडामोडी चालू आहेत. काम आणि क्रोध हे षडविकारातले प्रमुख विकार हे या रजोगुणाचेच प्रताप आहेत. संसारामध्ये सारखे आणखीन हवे असे वाटणे, कितीही विषयोपभोग मिळाले तरी तृप्ती न होणे, सदोदित अशांती व काळजीत मग्न राहणे, इच्छा, आकांक्षा, हव्यास वाढतच जाणे हा रजोगुणी स्वभाव होय. रजोगुणी मनुष्य धर्म म्हणून जे करतो, ते केवळ दांभिक भावानेच करतो कारण मनात कामाची आसक्ति असते. रजोगुण माणसाच्या इच्छा वाढवत असतो. त्यामुळे मनुष्य कामाच्या आसक्तीने धर्म करतो, केलेले कर्म निश्चयपूर्वक उपभोगून घेतो आणि त्यामुळे तो स्वत:लाच जन्ममरणाच्या भोवऱ्यात अडकवतो. यातून कल्पांतीसुद्धा त्याची सुटका होत नाही.
माणसाचा स्वभाव जसजसा सात्विक होत जाईल तसतसे तो ज्ञान आणि शांतीचा धनी होईल. त्यादृष्टीने आपण सत्व, रज आणि तम गुणांचा तौलनिक अभ्यास करत आहोत. सत्वगुणी मनुष्य ज्ञान आणि मन:शांती मिळवत असतो आणि त्याचा उपयोग त्याने ईश्वरप्राप्तीसाठी करावा अशी अपेक्षा असते. मात्र काही वेळा त्याला स्वत:च्या ज्ञानाचा आणि मन:शांतीमुळे मिळणाऱ्या सुखाचा अहंकार वाटू लागतो आणि त्यामुळे तो ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक ते ज्ञान आणि शांती बाळगत असूनसुद्धा ईश्वरापासून दूर जातो. रजोगुणी मनुष्य कसल्या ना कसल्या अपेक्षेने सतत काम करत असतो. त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे त्याच्या स्वभावातच नसते.
म्हणून प्रत्येकाने निरपेक्ष राहून प्राप्त होणाऱ्या वस्तू, व्यक्ती वा परिस्थिती या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत हे लक्षात घेऊन त्यासंबंधी आवश्यक ते कर्तव्य निरपेक्षतेनं करावं म्हणजे मन त्यात गुंतून राहणार नाही. सुखदु:ख, काम, क्रोध इत्यादि विकारांनी घेरलेले मन अनेक प्रकारचे संकल्पविकल्प करू लागते. एकांतात असतानाही ध्यानामध्ये विलासाचेच विचार येत असतात. रजोगुणाने दुष्ट वासना उत्पन्न होऊन बुद्धीही दुष्टच होते. तसेच धन, धान्य, पुत्र, यांचे सुख असावे, इहलोकचे व परलोकचे सुख असावे, अशी रजोगुणी व्यक्तीची अतिशय उत्कट इच्छा असते.
क्रमश: