वयाच्या ‘या’ टप्प्यात वेगाने वृद्ध होतो मनुष्य
वैज्ञानिकांनी संशोधनात केला खुलासा
वय वाढणे एक मंद प्रक्रिया वाटू शकते, परंतु माणसाचे वय नेहमीच वाढत नसल्याचे संशोधनातून समोर आले आहे. नेचर एजिंगमध्ये प्रकाशित अध्ययनात माणूस स्वत:च्या आयुष्यात केवळ 2 वेळा वेगाने वृद्धत्वाकडे सरसावतो, पहिले सरासरी वयाच्या 44 व्या वर्षी आणि 60 व्या वर्षी हे घडत असते.
आम्ही काळासोबत हळूहळू बदलत नाही तर यात काही नाट्यामय परिवर्तनही होत असतात. 40 च्या दशकाच्या मध्यात आणि 60 च्या दशकाच्या प्रारंभी हे परिवर्तन होतात आणि माणसाचे वय वेगाने वाढते असे स्टॅनफोर्ड युनिव्ह्रसंटीचे जेनेटिस्टिट मायकल स्नायडर यांनी म्हटले आहे. 108 प्रौढांच्या एका समुहावर नजर ठेवण्यात आली, जे अनेक वर्षांपासून दर काही महिन्यांमध्ये बायोलॉजिकल सॅम्पल डोनेट करत होते. काही स्थितींमध्ये अल्झायमर आणि हृदयविकार जोखीम काळासोबत हळूहळू वाढत नाही, तर एका निश्चित वयानंतर हे वेगाने वाढत असल्याचे संशोधनात दिसून आले.
मायकल यांनी ज्या अणूंचे अध्ययन केले, त्यातील जवळपास 81 टक्क्यांमध्ये यातील एक किंवा दोन टप्प्यांदरम्यान परिवर्तन दिसून आले. 40 च्या दशकाच्या मध्यात आणि मग 60 च्या दशकाच्या प्रारंभी परिवर्तन अधिक होते, परंतु काहीशा वेगळ्या प्रोफाइलसह असे नमूद करण्यात आले आहे. वयाच्या 40 च्या दशकाच्या मध्यात लिपिड, कॅफिन आणि अल्कोहोलच्या मेटाबॉलिज्ममुळे संबंधित अणूंमध्ये परिवर्तन दिसून आले. तसेच हृदयसंबंधीत आजार आणि त्वचा-स्नायुंमध्ये शिथिलता दिसून आली. 60 च्या दशकाच्या प्रारंभी कार्बोहायड्रेट आणि कॅफीन मेटाबॉलिज्म, हार्ट डिसिज, त्वचा, स्नायू आणि किडनीशी निगडित अधिक स्थिती होती. म्हणजेच माणूस वयाच्या 44 आणि 60 व्या वर्षीच जलद वृद्ध होतो असे म्हटले जाऊ शकते. तसेच या काळात आरोग्यावर लक्ष दिल्यास माणूस ही स्थिती टाळू देखील शकतो.