For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिनाभराचा अवधी; वाहनचालकांची गर्दी

11:22 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिनाभराचा अवधी  वाहनचालकांची गर्दी
Advertisement

लाखो वाहने एचएसआरपी नंबर प्लेटच्या प्रतीक्षेत

Advertisement

बेळगाव : हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) लावण्यासाठी अवघ्या महिनाभराची मुदत राहिली आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी डिलर्सकडे नंबरप्लेट बसविण्यासाठी वाहनचालकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. जुन्या वाहनांची संख्या पाहता डिलर्सची संख्या वाढविण्याची मागणी वाहनचालकांतून करण्यात येत आहे. जुन्या वाहनांच्या नंबर प्लेट गहाळ झाल्या असून यांचा वापर तस्करी, चोऱ्या, गुन्हेगारी जगतात केला जात आहे. यावर निर्बंध आणण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने एचएसआरपी नंबर प्लेट सक्तीची केली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी राज्यात रजिस्ट्रेशन झालेल्या सर्व वाहनांना नव्या नंबर प्लेट लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने राज्यातील वाहनचालकांना दोनवेळा मुदत दिली असून 31 मे ही अंतिम तारीख असणार आहे. एचएसआरपी नोंदणीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येते. www.sग्aस्.ग्ह या वेबसाईटवर जाऊन वाहनचालक नोंदणी करू शकतात. शहरातील संबंधित कंपनीच्या डिलर्सकडे कोणत्या तारखा शिल्लक आहेत, याची माहिती दर्शविली जाते. त्यानंतर निश्चित रक्कम भरून नंबर प्लेटसाठी अर्ज दाखल केला जातो.

जिल्ह्यात 12 लाख जुनी वाहने

Advertisement

बेळगाव जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. प्रशासनाने बेळगाव व चिकोडी असे दोन उपजिल्हे तयार केले आहेत. बेळगाव जिल्ह्यामध्ये 12 लाख 7 हजार 437 वाहनांना एचएसआरपी लावणे गरजेचे आहे. यापैकी मार्चअखेरपर्यंत अंदाजे 40 हजार वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी गर्दी होत आहे.

डिलर्सची संख्या वाढविण्याची गरज...

31 मे ही एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची अंतिम तारीख असल्याने वाहनचालकांची धावपळ सुरू झाली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याने ग्राहक डिलर्सकडे गर्दी करत आहेत. हिरो कंपनीच्या वाहनांची संख्या मोठी असून मोजकेच डिलर असल्याने एचएसआरपीसाठी स्वतंत्र कक्ष उभारून अधिकाधिक लोकांना लवकर नंबर प्लेट बसवता येतील, याची सोय करण्याची मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.