महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अंगठ्याप्रमाणे दिसणारे शिखर

07:00 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अत्यंत अनोखा आहे हा पर्वत

Advertisement

ले पॉउस हा मॉरिशसच्या सर्वात प्रसिद्ध पर्वतांपैकी एक आहे. हा स्वत:च्या असामान्य आकारामुळे अत्यंत अनोखा पर्वत आहे, याचे शिखर अंगठ्याप्रमाणे दिसते. याचमुळे याचे नाव ले पॉउस ठेवण्यात आले आहे. या पर्वतावर चढाई करणे अत्यंत अवघड मानले जाते. आता या पर्वताची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या पर्वतावर सर्वप्रथम चढाई करण्याचे श्रेय चार्ल्स डार्विन यांना देण्यात येते. ले पॉउस पर्वताची उंची 812 मीटर इतकी असून हा मॉरिशसमधील तिसऱ्या क्रमांकाचा उंच पर्वत आहे. हा मोका पर्वतरांगेत असून अंगठ्याच्या आकारामुळे याला ले पॉउस हे नाव पडले आहे. ले पॉउस पर्वत मॉरिशसच्या मध्य क्षेत्रात पेटिट वर्गर सेंट पियरे या गावात आहे. शिखरावर चढाई करणे अत्यंत अवघड आहे. ले पॉउस पर्वत स्वत:च्या नैसर्गिक सौंदर्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. येथे दुर्लभ वनस्पती देखील आढळून येतात , यातील काही वनस्पती तर केवळ येथेच आढळत असतात. या वनस्पतींमध्ये दुर्लभ बोइस डेंटेल, एलेओकापर्स बोजेरी आणि सिलिंड्रोक्लाइन कॉमर्सोनेई सामील आहे.  बोइस डेंटलला ‘लेस वुड’ या नावाने देखील ओळखण्यात येते. यातील केवळ दोन वृक्षच जगात शिल्लक राहिले आहेत. याचबरोबर स्थानिक रोपांमध्ये ‘पांडनस स्यूडोमोंटानस’ सामील असून ते देखील विलुप्त होण्याच्या धोक्याला सामोरे जात आहे.
Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article