For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भटक्या श्वानांसाठी पार्क अन् स्वीमिंग पूल

06:19 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भटक्या श्वानांसाठी पार्क अन् स्वीमिंग पूल
Advertisement

तैवानमध्ये मजेत राहतात भटके श्वान

Advertisement

तैवानची राजधानी तैपेईला आता श्वानस्नेही शहरांचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. तेथे भटक्या श्वानांसाठी पार्क, स्वीमिंग पूल, मेट्रोल आणि बस यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. लोक मोठ्या संख्येत श्वानांना दत्तक घेतात आणि त्यांना परिवाराचा हिस्सा मानतात. तैपेईमध्ये आयोजित एक डॉग स्प्रिंग आउटिंग इव्हेंटदरम्यान परिवर्तनाची ही कहाणी समोर आली आहे.

या कार्यक्रमात शहराचे महापौर देखील श्वानस्नेही मेट्रो आणि बसमधून प्रवास करत पोहोचले. या कार्यक्रमात 100 हून अधिक श्वानमालक सामील झाले होते. एकेकाळी तैवानमध्ये देखील भटक्या श्वानांची समस्या अत्यंत गंभीर होती. स्थिती इतकी खराब होती की, सरकारी शेल्टर्सच्या स्थितीवरून नाराजी वाढली होती. या समस्येला नियंत्रित करण्यासाठी तैवानने 1998 मध्ये अॅनिमल प्रोटेक्शन अॅक्ट लागू केला. यानंतर 2013 मध्ये 12 नाइट्स नावाचा माहितीपट आला, ज्यात सरकारी शेल्टरची अवस्था दाखविण्यात आली होती. या माहितीपटाने लोकांना हादरवून सोडले आणि देशात मोठे जनआंदोलन सुरू झाले.

Advertisement

यानंतर सरकार आणि स्थानिक प्रशासनाने मिळून अनेक मोठी पावले उचलली. हळूहळू लोकांचा दृष्टीकोन बदलला आणि भटक्या श्वानांवरून जागरुकता वाढली. तैवानमध्ये प्रत्येक पाळीव श्वानाच्या कानात मायक्रोचिप बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या चिपमध्ये श्वान आणि त्याच्या मालकाची पूर्ण माहिती नमूद असते. याच्या मदतीने अनेक हरवलेले श्वान आणि मालकाला सहजपणे शोधता येऊ शकते.

सरकारने भटक्या श्वानांच्या ट्रॅकिंगसाठी जियो टॅगिंग अॅपही सुरू केला. यात नागरिक कुठल्याही भटक्या श्वानाचा फोटो, लोकेशनसोबत अपलोड करू शकतो. ज्यानंतर महापालिकेची टीम तेथे पोहोचून लसीकरण अन् उपचार करते. तर एखाद्या मालकाने स्वत:चा पाळीव श्वान रस्त्यावर सोडून दिल्यास त्याच्यावर दंड ठोठावण्यात येतो. अशाप्रकरणांमध्ये सुमारे 10 हजार रुपयांपर्यंचा दंड वसूल करण्यात येतो.

तैपेईमध्ये अनेक ठिकाणी डॉग पार्क तयार करण्यात आले असून तेथे लोक स्वत:च्या पाळीव श्वानांना फिरविण्यासाठी आणत असतात. काही ठिकाणी श्वानांसाठी स्वीमिंग पूलही तयार करण्यात आले आहेत. शहरात श्वानस्नेही मेट्रो आणि बससेवाही उपलब्ध आहे.

Advertisement

.