For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियन महिला संघाचा एकतर्फी विजय

06:36 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियन महिला संघाचा एकतर्फी विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ मीरपूर

Advertisement

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटसंघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील रविवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान बांगलादेशचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिलीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. बांगलादेशने 20 षटकात 4 बाद 126 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 13 षटकात बिनबाद 127 धावा जमवित हा सामना एकतर्फी जिंकला.

Advertisement

बांगलादेशच्या डावामध्ये मुर्शिदा खातूनने 27 चेंडूत 1 चौकारासह 20, कर्णधार निगार सुल्तानाने 64 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 63, फहिमा खातूनने 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 27 धावा जमविल्या. बांगलादेशला 15 अवांतर धावा मिळाल्या. त्यांच्या डावामध्ये 1 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे सोफी मॉलिन्यूक्सने 25 धावांत 2 तर व्हॅलिमिनेक आणि व्हेरहॅम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार अॅलिसा हिली आणि बेथ मुनी यांनी 13 षटकात अभेद्य 127 धावांची शतकी भागिदारी केली. हिलीने 42 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 65 तर बेथ मुनीने 36 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 55 धावा झोडपल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 1 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले.

संक्षिप्त धावफलक - बांगलादेश 20 षटकात 4 बाद 126 (मुर्शिदा खातुन 20, निगार सुलताना नाबाद 63, फाहिमा खातून 27, अवांतर 15, मॉलिन्यू 2-25, व्हॅलेमिनेक 1-30, वेअरहॅम 1-18), ऑस्ट्रेलिया 13 षटकात बिनबाद 127 (हिली नाबाद 65, बेथ मुनी नाबाद 55, अवांतर 7).

Advertisement
Tags :

.