For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेब्बाळकरांसाठी पोषक वातावरण

11:31 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेब्बाळकरांसाठी पोषक वातावरण
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा दावा : भाजीमार्केट, फूल मार्केटमध्ये प्रचार

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाला दिवसेंदिवस मोठा पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या विजयाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे, असा दावा महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. शहरातील बाजारपेठेमध्ये मंत्री हेब्बाळकर यांनी जोरदार प्रचार करून व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. भाजीमार्केट, फूल मार्केट, फळ मार्केट आदी ठिकाणी भेटी देऊन मतदारांना काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पाच गॅरंटी योजना जनकल्याणाच्या ठरल्या आहेत. या योजनांमुळे अनेक गरजू नागरिकांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. केंद्रात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास आणखी गॅरंटी योजना जारी केल्या जातील. या माध्यमातून गोरगरीब जनतेचे कल्याण साधले जाईल, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

शेतकरी, व्यापारी यांना कोणतीच जात नाही. दोघेही व्यवस्थित राहिल्यास कोणालाही त्रास होणार नाही. गोडी गुलाबीने राहून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे. काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर निवडून आल्यास व्यापाऱ्यांच्या समस्या मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन मंत्री हेब्बाळकर यांनी दिले. यावेळी आमदार राजू सेठ, काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांची भाषणे झाली. मतदारांकडे पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली. यावेळी बेंगळूर उत्तर लोकसभा उमेदवार प्रा. राजीव गौड, नगरसेवक मुजम्मील डोणी, भाजी मार्केट संघटनेचे अध्यक्ष दिवाकर पाटील, उपाध्यक्ष मोहन मन्नोळकर, ए. के. बागवान, एम. एम. डोणी, उमेश पाटील, विश्वनाथ पाटील, काका हावळ, प्रकाश बाबन्नावर, संजय भावी आदी व्यापारी उपस्थित होते.

Advertisement

समस्यांची जाणीव नाही

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील जगदीश शेट्टर की मृणाल हेब्बाळकर पाहिजे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्थानिक जनतेच्या समस्यांची जाणीव नसताना अचानक येऊन निवडणुकीला उभे राहून मते मागत आहेत. भाजपमध्ये असताना सर्व प्रकारचे अधिकार त्यांनी अनुभवले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राहुल गांधी यांना पंतप्रधान करावे, असे म्हटले होते. निवडणुकीमध्ये पराभूत झाले असले तरी एमएलसी पद देण्यात आले. यानंतर मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करावे, यासाठी त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला, अशी टीका मंत्री हेब्बाळकर यांनी केली.

Advertisement
Tags :

.