महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चीनमध्ये मिळाला नवा विषाणू

06:13 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एक रुग्ण कोमामध्ये पोहोचला : : थेट मेंदूवर करतो आक्रमण

Advertisement

वृत्तसंस्था/ बीजिंग

Advertisement

कोरोना विषाणूनंतर चीनमध्ये आता आणखी एक नवा विषाणू आढळून आला आहे. सर्वप्रथम हा विषाणू 2019 मध्ये चीनच्या इनर मंगोलिया येथे आढळला होता. प्राण्यांमधून हा विषाणू माणसांमध्ये फैलावला आहे.

2019 मध्ये चीनच्या जिनझोउ शहरात 61 वर्षीय इसम अचानक आजारी पडला होता. 5 दिवसांपूर्वी एका प्राण्याने चावा घेतला होता. वैद्यकीय तपासणीत संबंधित इसम ऑर्थोनेरोवायरसने संक्रमित असल्याचे आढळून आले होते. हा विषाणू थेट मेंदूला प्रभावित करत असतो.

द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनने स्वत:च्या प्रकाशित एका अहवालात विषाणूला वेटलँड वायरस नाव दिले आहे. याचबरोबर संबंधित प्राण्यांनी चावा घेतलेल्या अन्य रुग्णांवरही देखरेख ठेवण्यात आली आहे. वेटलँड वायरस नॅरोविरिडे परिवारात ऑर्थोनेरोवायरस जीनसचा सदस्य आहे आणि हा ऑर्थोनेरोवायरस जीनोग्रूपचा अत्यंत नजीकचा आहे. हा विषाणू माणसांमध्ये गंभी आजारांचे कारण ठरू शकतो.

हा विषाणू चीनमध्ये सुमारे 17 रुग्णांमध्ये आढळून आला आहे. या रुग्णांमध्ये ताप, चक्कर येणे, डोकेदुखी, अस्वस्थता, पाठदुखी यासारखी लक्षणे दिसून आली. तर एका रुग्णात न्यूरोलॉजिक लक्षण देखील होते.

संशोधकांनी क्षेत्रातील वनरेंजरांच्या रक्ताच्या नमुन्यांचेही विश्लेषण केले आहे. सुमारे 640 लोकांपैकी केवळ 12 जणांमध्ये वेटलँड वायरससंबंधीच्या अँटीबॉडी आढळून आल्या. तर एक रुग्ण कोमामध्येही गेला. परंतु सर्व रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये हा विषाणू अत्यंत धोकादायक ठरू शकतो असे संशोधनात आढळून आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article