महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केरळमध्ये सापडला नवा विषाणू

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

5 जणांचा मृत्यू : मेंदूवर परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/तिरुवनंतपुरम

Advertisement

केरळमध्ये मेंदूवर परिणाम करणारा नवीन विषाणू सापडल्यामुळे आरोग्यविषयक चिंतेचे ढग कायम आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 15 ऊग्ण आढळून आले असून त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूला अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस असे नाव देण्यात आले आहे. या विषाणूची सर्वाधिक 7 प्रकरणे तिरुवनंतपुरममध्ये नोंदवली गेल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी दिली. अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस संदर्भात एक वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आले असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र, अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आलेली नाहीत. मात्र केंद्र सरकारने विषाणूच्या उपचारासाठी औषधांचा पुरवठा केला आहे. तसेच जर्मनीतून औषधे खरेदी केली जात असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article