Solapur News : सोलापूर रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक नवा फूट ओव्हर ब्रिज उभारणार
सोलापूर स्थानकात नवा एफओबी
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. सध्या स्थानकावरील दक्षिण दिशेला असलेला जुना फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) गर्दीसाठी अपुरा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने येथे अत्याधुनिक आणि प्रशस्त नवा फूट ओव्हर ब्रिज उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नवा फूट ओव्हर ब्रिज ६ बाय २५० मीटरचा असेल. तो सोलापूर रेल्वे स्थानकावरील १ ते ५ या सर्व प्लॅटफॉर्मला थेट जोडला जाईल. त्यामुळे कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सहज, सुरक्षित आणि वेगाने पोहोचता येणार आहे. लिफ्ट, सरकते जिने असतील.सोलापूर रेल्वे स्थानकात एकूण ६ सरकते जिने (एस्केलेटर) तसेच २ लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे हा फुट ओव्हर ब्रिज बांधण्यासाठी अंदाजे ८ ते ९ कोटी रुपयांचाखर्च अपेक्षित असून एफओबीचा सविस्तर सर्व्हे पूर्ण झाला आहे. येत्या सहा महिन्यांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असून सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठअधिकाऱ्यांनी दिली आहे.प्रवाशांसाठी काय बदलेल?नव्या एफओबीमुळे सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्रवासी व्यवस्थापनात आमूलाग्र बदल होणार आहे.
सध्या प्लॅटफॉर्म बदलताना होणारी गर्दी, बेळेची नासाडी आणि अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला, लहान मुले तसेच अवजड सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लिफ्ट व सरकते जिने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. यामुळे गाड्यांपर्यंत पोहोचण्याचा वेळ कमी होईल, प्रवाशांची हालचाल अधिक सुरळीत होईल आणि स्थानकातील गर्दीचे योग्य नियोजन शक्य होणार आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता