For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाचा नवा विक्रम!

12:04 PM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
पावसाचा नवा विक्रम
Advertisement

जुलैमध्येच गाठले शतक: आगामी चार दिवसांत मुसळधार : ऑरेंज अलर्ट जारी

Advertisement

पणजी : गोव्याच्या इतिहासात प्रथमच जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने इंचाचे शतक पार केले. गेले पंधरा दिवस सलगपणे साडेतीन ते चार इंच दैनंदिन पडणाऱ्या पावसाने कहरच केला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत यावर्षीचा पाऊस हा 57 टक्के अधिक आहे व सरासरीच्या तुलनेत सुमारे 38 इंच जादा पाऊस झालेला आहे. गेले 18 दिवस गोव्यात सूर्यदर्शन झालेले नाही. अनेक ठिकाणी झाडे मरायला लागलेली आहेत. पावसाचा अतिरेक शेतीला देखील मारक ठरणार असे दिसते. आगामी चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गोव्यात अल्पावधीतच पावसाने इंचाचे शतक पार केले आहे. शक्मयतो इंचाचे शतक ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पार केले जाते. काहीच वेळा ते सप्टेंबरमध्ये देखील पार केले जाते, मात्र यावर्षी अवघ्या 50 दिवसांच्या आत पावसाने इंचाचे शतक गाठले आहे. गेल्या पंधरा दिवसात पावसाने कहर केलेला आहे. सुमारे 56 इंच पाऊस हा गेल्या पंधरा दिवसात पडलेला आहे. पावसाची सर्वत्र संततधार गेले दहा दिवस चालू असल्यामुळे अनेक माडांवर तसेच पोफळींवर देखील विपरीत परिणाम झालेला आहे. अनेक ठिकाणी आंब्याची झाडे पर्णहीन झाली आहेत. परिणामी जमिनीत पाण्याचे प्रमाण वाढल्याने गोव्यात सर्व ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यंदा वाढले आहे. आठ दिवसांपूर्वी गोव्यातील तीन ठिकाणी पावसाने इंचाचे शतक गाठले होते. अंजुणे धरण क्षेत्रात पाऊस 120 इंचापर्यंत पोहोचला आहे. वाळपईत देखील हीच परिस्थिती आहे.

Advertisement

गेल्या 24 तासात राज्यात पावसाचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसाच्या तुलनेत प्रथमच खाली उतरलेले दिसते साधारणत: सरासरी दोन इंच पावसाची नोंद झाली. राज्यात पेडणे, फोंडा, सांखळी, वाळपई, काणकोण, केप व सांगे या ठिकाणी पावसाने शतक ओलांडलेले आहे. यंदाचा पाऊस हा विक्रमी ठरला आहे. सुमारे 25 वर्षानंतर प्रथमच पावसाने आपले सारे रेकॉर्ड तोडून एक नवा विक्रम गोव्यात प्रस्थापित केला. एव्हाना, वार्षिक सरासरीच्या तुलनेत 64 इंच पाऊस होतो. यंदा तो 101 इंच झालेला आहे. म्हणजे 37 इंच ज्यादा पाऊस आहे.

Advertisement
Tags :

.