विरोधकांच्या राजकारणात नवी फळी
दिल्ली ही देशाच्या सत्तेची राजधानी पण सत्तेला आव्हान देणाऱ्या आंदोलनांचे पेंद्र आता दिल्लीपाठोपाठ मुंबई होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबईचे स्थान केवळ भौगोलिक किंवा आर्थिक नाही, तर ते सत्तासंघर्षाच्या दृष्टीनेही निर्णायक आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर घुमणाऱ्या आंदोलनांच्या घोषणा केवळ राजकीय शक्तिप्रदर्शन म्हणून पाहून चालणार नाही. राजकारणात आंदोलन हे केवळ नाराजी व्यक्त करण्याचे साधन नसतेय ते सत्तेला जाब विचारण्याचे आणि जनमत संघटित करण्याचे प्रभावी माध्यम असते. मात्र, आंदोलनाची खरी ताकद गर्दीत नसते, तर त्यातून उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या गांभीर्यात असते. महाराष्ट्राच्या राजकारणात आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि रोहीत पवार यांना सध्या राजकीय ओळख निर्माण करण्याची संधी आहे,
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या नेतफत्वाची चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते राजकीय संघर्षाची दिशा ठरवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि रोहित पवार ही नवी पिढी राजकीय मैदानात अधिक सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे प्रश्न केवळ तीन तऊण नेत्यांच्या राजकीय भवितव्याचा नाही, तर महाराष्ट्रातील विरोधकांच्या नेतफत्वाची सूत्रे पुढील काळात कोणाच्या हातात जाणार, याचाही आहे. जुन्या नेतफत्वाचा अनुभव आणि नव्या पिढीचा आक्रमकपणा यांची सांगड घालून विरोधकांना नवी दिशा देता येईल का? की राजकीय वारसा मिळाला असला, तरी स्वतंत्र नेतफत्व सिद्ध करण्यासाठी या तिघांना आणखी मोठा संघर्ष करावा लागणार आहे?
मुंबईत रविवारी कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धरपकड सुऊ केली होती. यावेळी शिवसेना भवनासमोर ठाकरेंचे शिवसैनिक आणि मुंबई पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याचे समोर आले. यावेळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे थेट पोलिसांना भिडल्याचे समोर आले. यावेळी, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे थेट पोलीस गाडीवर चढल्याचे दिसून आले. आदित्य ठाकरे यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाची संघटना टिकवणे, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे, ही त्यांच्यासमोरील आव्हाने आहेत. दुसरीकडे, अमित ठाकरे यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय विस्तारात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणे महत्त्वाचे आहे. दोघे चुलतभाऊ आहेत, त्यांचे पक्ष वेगळे आहेत आणि राजकीय वाटचालीची आव्हानेही वेगवेगळी आहेत. आंदोलनाच्या प्रसंगी एकत्र येणे आणि दीर्घकाळ एकत्रित राजकीय भूमिका टिकवणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांच्या एकत्रित उपस्थितीला संभाव्य राजकीय समन्वयाची सुऊवात म्हणता येईल, परंतु त्यातून कायमस्वरूपी राजकीय समीकरण तयार झाले आहे, असा निष्कर्ष काढणे सध्या तरी घाईचे ठरेल. ठाकरे कुटुंबातील दोन तऊण नेत्यांप्रमाणेच रोहित पवार हेही विरोधी राजकारणातील सक्रिय युवा चेहरा म्हणून पुढे येत आहेत. त्यांची राजकीय वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाशी संबंधित आहे. मात्र, त्यांची ओळख केवळ पवार कुटुंबातील पुढची पिढी एवढीच मर्यादित राहणार की ते स्वतंत्र जनाधार असलेले नेतफत्व म्हणून उभे राहणार, हे त्यांच्या कामगिरीवर ठरणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारासंदर्भातील प्रश्न आणि परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधातील उमेदवारांच्या आंदोलनात रोहित पवार सक्रिय आहेत. आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि या प्रश्नावर सरकारची भूमिका, यावरून त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोरदार संघर्ष सुरू असल्याचे आपण पाहिले. नीट पेपर फुटीनंतर दिल्लीत जंतर-मंतर वर झालेल्या झेन-झी च्या आंदोलनाने मरगळ आलेल्या विरोधीपक्षाला बळ मिळाले, या आंदोलनाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर तरूणांना संघटीत कऊन, तऊण मतदारांशी संवाद साधणे, तरूणांच्या प्रश्नांना कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता, तिरंगा झेंड्याच्या खाली एकत्र आणता आणता विरोधीपक्षच आता एकत्र आल्याचे दिसत आहे. आंदोलनात सहभागी होणे, सरकारला जाब विचारणे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणे, हे विरोधी पक्षांच्या राजकारणातील महत्त्वाचे घटक आहेत. आदित्य ठाकरे, रोहित पवार हे आमदार म्हणून पक्षाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करत असल्याने त्यांच्याकडे विरोधीपक्षाचे नेते म्हणूनच पाहिले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. ठाकरे असोत किंवा पवार त्यांच्या पुढच्या पिढीला जनतेपर्यंत पोहोचण्याची ओळख वारशाने मिळाली आहे. त्यामुळे या नवीन नेतृत्वाला राजकारणात प्रवेश करताना सुऊवातीपासून संघर्ष करावा लागलेला नाही, हा त्यांच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा पैलू आहे. मात्र सध्याच्या तऊण पिढीला केवळ राजकीय वारसा असलेले चेहरे नकोत, तर आपल्या विचारांशी नाळ जोडणारे, जमिनीवर राहून काम करणारे आणि स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नेतृत्व हवे आहे. त्यामुळेच विद्यानंद बापट, अभिजीत दिपके किंवा विवेकानंद पाटील यांच्याकडे वेगळ्यादृष्टीने पाहिले जात आहे. नवीन पिढी हुशार असल्याने ती आपला वापर कोणाच्याही राजकीय फायद्यासाठी होऊ देणार नाही, नवीन पिढीला आपल्या मागे उभे करणे सोपे असेल, पण तिला आपल्या विचारांमागे चालायला लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. केंद्रातील आणि राज्यातील राजकारण आणि सत्ताकारण बघता, विरोधीपक्ष आहे की नाही हेच कळत नाही. सातत्याने होणारी पेपरफुटी, सरकारी नोकऱ्यांची हमी नसणे, या तरूणांना स्वत:ची मते आहेत, स्वत:च्या अपेक्षा आहेत, त्यामुळे ही पिढी त्याच राजकीय चौकटीत स्वत:ला बसवून घेईल, हे गृहित धरणे चुकीचे ठरेल. त्यामुळे वारसा मिळाला असला तरी नेतृत्व सिध्द करण्याची कसोटी नवीन नेतृत्वासमोर असणार आहे.
प्रवीण काळे
