For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धावपटू दीक्षाकडून नवा भारतीय विक्रम

06:20 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
धावपटू दीक्षाकडून नवा भारतीय विक्रम
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लॉस एंजेल्स येथे झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताची महिला धावपटू के. एम. दीक्षाने 1500 मी. धावण्याच्या शैर्यतीत नवा भारतीय विक्रम नोंदविला. तर पुरूषांच्या 5000 मी. धावण्याच्या शैर्यतीत भारताच्या अविनाश साबळेने दुसरे स्थान मिळविले.

महिलांच्या 1500 मी. धावण्याच्या स्पर्धेत 25 वर्षीय दीक्षाने अंतिम फेरीत तिसरे स्थान मिळविताना 4 मिनिटे, 04.78 सेकंदाचा अवधी नोंदविला. तसेच तिने भारतातर्फे 2021 साली वारंगल येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हरमिलन बैन्सने नोंदविलेला 4 मिनिटे, 0.5.39 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. दिक्षाने यापूर्वी या क्रीडा प्रकारात 2023 साली भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नोंदविलेली 4 मिनिटे, 06.07 सेकंदाचा सर्वोत्तम विक्रम मागे टाकला. भुवनेश्वरमध्ये झालेल्या या स्पर्धेत दीक्षाने बैन्सला मागे टाकत सुवर्णपदक मिळविले होते. मध्यप्रदेश अॅथलेटिक्स अकादमीमध्ये गेली 5 वर्षे दीक्षा सराव करीत असून तिला एस. के. प्रसादचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

लॉस एंजेल्स येथे झालेल्या स्पर्धेत भारताच्या पारुल चौधरीने महिलांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत पाचवे स्थान मिळविले. तर अंकिताला 10 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत अविनाश साबळेने 13 मिनिटे, 20.37 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान पटकाविले. लॉस एंजेल्समधील ही स्पर्धा विश्व अॅथलेटिक्स खंडीय टूरवरील कांस्यपदक स्तरावरील म्हणून ओळखली जाते.

Advertisement
Tags :

.