महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेत हरणांमध्ये फैलावतोय नवा आजार

06:43 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तर अमेरिकेत सध्या हरणांमध्ये एक भयानक आजार फैलावला आहे. तसेच या आजाराचे नाव क्रोनिक वेस्टिंग डिसीज आहे, परंतु लोक याला जॉम्बी डियर डिसीज म्हणत आहेत. हा आजार अत्यंत वेगाने हरणांमध्ये फैलावत आहे.

Advertisement

हा आजार माणसांमध्ये फैलावण्याची चिंता आता वैज्ञानिकांना सतावू लागली आहे. या आजारात न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होते, यात हरिण जणू नशेत असल्याप्रमाणे वावरत असते. तसेच ते आळशी होते, त्याला नीटपणे चालता देखील येत नाही. केवळ एकटक पाहत बसते, केवळ व्योमिंगमध्येच आतापर्यंत 800 हून अधिक हरिण, एल्क आणि मूजमध्ये हा आजार दिसून आला आहे.

Advertisement

सीडब्ल्यूडी म्हणजेज झॉम्बी डियर डिसीज फैलावण्यासाठी प्रायन्स जबाबदार असल्याचे मानले जात आहे. प्रायन्स प्रत्यक्षात चुकीच्या पद्धतीने फोल्ड झालेले प्रोटीन असतात, जे मेंदूत असलेल्या सामान्य प्रोटीनला देखील चुकीच्या पद्धतीने फोल्ड होण्यास भाग पाडतात. यामुळे न्यूरोलॉजिकल डिजनरेशन होते, म्हणजेचा मेंदूचा विकास थांबतो, मेंदूमध्ये गोष्टी समजून घेण्याची क्षमता संपू लागते. प्रायन्समुळे होणारे आजार हिवाळ्यांपर्यंत पर्यावरणात राहू शकतात, संधी मिळताच हे आजार फैलावण्यास सुरुवात होते.

आजार संपविणे सध्या अवघड

फार्मलडिहाइड, रेडिएशन किंवा अत्यंत अधिक किंवा कमी तापमान देखील अशाप्रकराचे आजार संपवू शकत नाहीत. सीडब्ल्यूडी फैलावण्याचा सर्वाधिक धोका माणूस आणि पर्यावरण दोघांनाही आहे. हा आजार माणसांना थेट स्वरुपात संक्रमित करू शकतो की नाही याचा थेट पुरावा सध्या नाही. प्रायन्समुळे आणखी एक आजार होतो, ज्याला क्रेयुझफेल्ड-जेकॉब डिसिज (सीजेडी)  म्हटले जाते. हा आजार माणसांना होतो, यालाच गायींकरता मॅड काउ डिसिज या नावाने ओळखले जाते. 1995 मध्ये हा आजार ब्रिटनमध्ये फैलावला होता. यामुळे लाखो गुरांना ठार करावे लागले होते. या आजारामुळे 178 लोकांनाही जीव गमवावा लागला होता.

 

अद्याप माणसांमध्ये लक्षणे नाहीत

माणसांमध्ये आतापर्यंत सीडब्ल्यूडीची लक्षणे दिसून आलेली नाहीत. तसेच याचा रुग्णही सापडलेला नाही. परंतु काही कारणांमुळे हा आजार माणसांमध्ये फैलावू शकताहे. प्रयोगशाळेत प्रायन्स माणसांनाही संक्रमित करण्याची क्षमता बाळगून असल्याचे दिसून आले आहे. तर माणूस संक्रमित जीवाची शिकार करून त्याचे सेवन करत असल्याने हा आजार होण्याची शक्यता आहे.

मांससेवनावर बंदी

2017 मध्ये 15 हजार सीडब्ल्यूडी संक्रमित प्राण्यांच्या मांसाचे माणसांकडून सेवन करण्यात आले होते. जंगलात शिकार करून अशाप्रकारचे प्राणी खाण्याचे प्रमाण दरवर्षी 20 टक्के दराने वाढत आहे. सर्वाधिक सीडब्ल्यूडीने ग्रस्त प्राणी विस्कॉन्सिनमध्ये दिसून आले आहेत. येथे हजारो लोकांनी संक्रमित हरणांचे मांस खाल्ले आहे. प्रत्यक्षात त्यावर बंदी आहे.

प्रथम युरोपमध्ये दिसला होता आजार

प्रायन्समुळे होणाऱ्या आजारांचे निदान करणे अत्यंत अवघड आहे, विशेषकरून माणसांमध्ये. प्रायन्समुळे शरीरात कुठल्याही प्रकारचे इम्यून रिस्पॉन्स निर्माण होत नाही. सध्या या आजाराने माणसांमध्ये शिरकाव केल्याचे उघडकीस आलेले नाही. तर 2016 मध्ये नॉर्वेच्या जंगली हरणांमध्ये देखील हा आजार दिसून आला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article