For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केरळमध्ये आढळला नवा कोरोना विषाणू

06:22 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
केरळमध्ये आढळला नवा कोरोना विषाणू
Advertisement

वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम 

Advertisement

केरळमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. त्याला जेएन 1 या नावाने ओळखले जात आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव भारतात या राज्यात प्रथमच आढळला आहे. 18 नोव्हेंबरला एक 79 वर्षीय एका महिलेला याची लागण झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर या विषाणूचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यातून तो कोरोनाचा भारतात आजवर दिसून न आलेला जंतू असल्याचे समजले.

यापूर्वी हा विषाणू सिंगापूर, चीन आदी देशांमध्ये आढळला होता. सिंगापूरहून एक प्रवासी भारतात आला होता. त्यालाही याची लागण झाल्याचे आढळून आले होते. तथापि, विदेशात प्रवास न करताही याची लागण झाल्याची ही भारतातील प्रथम घटना आहे. हा नवा विषाणू अद्यापतरी फारसा गंभीर असल्याचे आढळून आलेले नाही, असे तज्ञांचे मत आहे. मात्र, भारतात प्रशासकीय पातळीवर अद्यापही दक्षतेचा इशारा दिला जात आहे. कोरोनाचे अनेक नवे विषाणू गेल्या एक वर्षात विकसीत झालेले आहेत. मात्र, कोणत्याही वेळी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसून आलेले नाही. तथापि, सात महिन्यांच्या कालांतराने भारतात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गंभीरता कमी दिसत असली, तरी लोकांनी अद्यापही मास्कचा उपयोग आणि हातांची स्वच्छता तसेच शक्य तितके सामाजिक अंतर या तीन उपयांचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. हे तीन उपाय कोरोना सोडून इतर रोगांच्या विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठीही साहाय्यभूत ठरतात, त्यामुळे सध्याच्या काळात उपाय योजना करण्यात पूर्णत: ढिलाई योग्य नाही, असा दक्षतेचा इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.