For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पृथ्वीवर नवा खंड ‘अमेसिया’चा होणार जन्म

06:07 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
पृथ्वीवर नवा खंड ‘अमेसिया’चा होणार जन्म
Advertisement

प्रशांत महासागर वेगाने आंकुचित पावतोय

Advertisement

जगातील सर्वात मोठ्या महासागरावरून वैज्ञानिकांनी सर्वात चिंताजनक भविष्यवाणी केली आहे. वैज्ञानिकांमध्ये या महासागराच्या अस्तित्वावरून चिंता आहे. प्रशांत महासागर आंकुचित पावण्यामागे टेक्टोनिक प्लेट्स कारणीभूत असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. प्रशांत महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेली सर्वात मोठी संरचना असून ती हळूहळू छोटी होत आहे.

एनओएए ओशन एक्सप्लोरेशनने स्वत:च्या अहवालात प्रशांत महासागर 155 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा अधिक भागात फैलावलेला आहे. पृथ्वीवर असलेले सर्व खंड अन् बेटांचा एकूण जमिनी आकार 149 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे. अशाप्रकारे प्रशांत महासागर एकटाच या सर्वांपेक्षा मोठा आहे. प्रशांत महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळपास एक-तृयीयांश हिस्स्याला व्यापून आहे आणि जगातील महासागरांच्या एकूण पाण्याच्या जवळपास निम्मा हिस्सा याच्यात आहे. अटलांटिक महासागरात प्रशांत महासागराच्या तुलनेत निम्मेच पाणी आहे.

Advertisement

जवळपास 200 ते 250 दशलक्ष वर्षांपूर्वी सुपरकॉन्टिनेंट पँजिया तुटला आणि प्राचीन सुपर-ओशन पँथालासामध्ये भेगा पडल्यावर प्रशांत महासागर निर्माण झाला होता. टेक्टोनिक प्लेट्सनी जमिनीला जसजसे वेगळे पेले, अटलांटिक महासागर निर्माण झाला आणि विशाल पँथालासा आंकुचित पावत प्रशांत महासागराच्या रुपात समोर आला.

प्रशांत महासागर जवळपास सबडक्शन झोनने वेढलेले आहे आणि याला ‘रिंग ऑफ फायर’ म्हटले जाते. हा दऱ्या, भूकंप अन् ज्वालामुखींचा एक बेल्ट असून तो महासागराच्या किनाऱ्यावर न्यूझीलंडहून जपान आणि मग अँडीजपर्यंत फैलावलेला आहे. प्रशांतमध्ये एक फैलावणारी रिज देखील असून त्याला ‘ईस्ट पॅसिसिफक रिज’ म्हटले जाते, परंतु याच्या आसपासच्या दऱ्यांमध्ये याच्या जमिनीचा इतका मोठा हिस्सा सामावत आहे की एकूणच हा बेसिन आंकुचित होत आहे.

संपण्याची भीती का?

याच दऱ्यांमध्ये महासागर स्वत:च्या सर्वात खोल अन् टोकाच्या स्थितीपर्यंत पोहोचतो असे वैज्ञानिक अहवालात म्हटले गेले आहे. पश्चिम पॅसिफिकमध्ये स्थित ‘मारियाना ट्रेंच’ पृथ्वीवर सर्वात खोल ठिकाण आहे. याची खोली जवळपास 11 हजार मीटर असून ती माउंट एव्हरेस्टला उलटं केल्यावर त्याच्या उंचीपेक्षाही अधिक आहे. हा एक सबडक्शन झोन आहे, म्हणजेच तेथे पॅसिफिकचा थर खालील बाजूने वळून ग्रहाच्या आत सरकत आहे. कुठल्याही महासागराचा सर्वात खोल बिंदू ठीक त्याच प्रक्रियेच्या वर स्थित आहे, जो हळूहळू या महासागराला बंद करत आहे. पॅसिफिकचा आकार जवळपास एकसारख्या वेगाने कमी होत आहे म्हणजेच अत्यंत हळूहळू आणि याची थांगपत्ता लाखो वर्षांदरम्यानच लागू शकतो.

अमेसिया खंड

प्रशांत महासागर भविष्यात पूर्णपणे अस्तित्वहीन होऊ शकतो. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन विद्यापीठात चुआन हुआंग यांच्या नेतृत्वाखालील एका टीमने सुपरकॉम्प्युटर सिम्युलेशनद्वारे खंड कुठल्या दिशेने सरकत आहेत हे शोधले होते. नॅशनल सायन्स रिह्यू जर्नलमध्ये प्रकाशित त्याच्या निष्कर्षांनुसार प्रशांत महासागर 20-30 कोटी वर्षांमध्ये अस्तित्वहीन होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. असे झाल्यास महाखंड एकत्र येत ‘अमेसिया’ नावाचा एक नवा महाखंड तयार करतील, कारण अमेरिका आणि आशिया परस्परांना जोडले जातील. ऑस्ट्रेलिया पूर्वीपासून दरवर्षी जवळपास 7 सेंटीमीटरच्या वेगाने आशियाच्या दिशेने सरकत आहे. भविष्याच्या दुसऱ्या सिम्युलेशनमध्ये अटलांटिक महासागर अस्तित्व गमाविण्याची आणि प्रशांत महासागर कायम राहणार असल्याचे म्हटले गेले आहे. यामुळे वेगवेगळ्या नावांचे वेगवेगळे खंड तयार होतील आणि सर्व देश परस्परांशी जोडले जातील.

Advertisement
Tags :

.