For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सातार्डा - जाधववाडीला जोडणारा नवीन पूल उभारणार

03:40 PM Mar 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सातार्डा   जाधववाडीला जोडणारा नवीन पूल उभारणार
Advertisement

जि.प. सदस्य सुदन कवठणकर यांची माहिती

Advertisement

सातार्डा -

सातार्डा - जाधववाडीला जोडणाऱ्या पुलाची पाहणी जि.प सदस्य सुदन कवठणकर व पं .समिती सदस्य उदय पारिपत्ये यांनी केली.पुलाची दयनीय अवस्था झाली आहे.नवीन पूल बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जि. प.सदस्य सुदन कवठणकर यांनी सांगितले. यावेळी योगेश गोवेकर,बाळा मांजरेकर,सुरज राऊळ,शैलेश आरोलकर, भिकाजी राऊळ, विलास टेमकर उपस्थित होते.जाधववाडीला जोडणाऱ्या पुलाला ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. बाजूला असलेला साकव जीर्ण झाला आहे.पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात लोकांची गैरसोय होते.दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतकडून पूल बांधण्यात आला होता.
जाधववाडीतील ग्रामस्थांनी कसरत करून पुलाचे काम पूर्ण केले होते. त्यानंतर ग्रामपंचायतने पुलाची डागडुजी केली होती. पूराच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पावसाळ्यात लोकांची गैरसोय होते.देवस्थानची पारंपरिक वाट असल्याने देवी माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना चाचपडावे लागते. रात्रीच्या धार्मिक कार्यक्रमांवेळी भाविकांची तारांबळ होते. पुलाची दयनीय अवस्था झाल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडत आहेत.जाधववाडी, घोगळवाडी, मुंबार्डेवाडी तसेच सातोसेत जाणाऱ्या पादचाऱ्यांना खड्डेमय पुलामुळे धोका संभवत आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तसेच इतर विशेष योजनेतून जाधववाडी जोडणाऱ्या ओहोळावर नवीन पूल बांधून शेतकरी, भाविक व लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे जि .प .सदस्य कवठणकर यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.