For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

बिळासारखा छाेटा रस्ता, आता गुप्त गुहा

07:00 AM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिळासारखा छाेटा रस्ता  आता गुप्त गुहा
Advertisement

तुम्ही एखाद्या शेतात फिरत असताना अचानक जमिनीत एका छोट्याशा ख•dयात डोकावून पाहिल्यास एखादी विशाल अन् सुंदर गुहा दिसून आली तर चकित व्हाल. हा प्रकार एखाद्या काल्पनिक कहाणीसारखा वाटतो. परंतु इंग्लंडच्या श्रॉपशायर भागात खरी ठरली आहे. येथे बेकबरीनजीक कँटन हॉलच्या खासगी जमिनीवर एक असेच दृश्य दिसून आले, तेथे सशाच्या एका बिळाखाली बलुआ दगडांनी कोरलेली कँटन केव्स नावाची एक मोठी अन् गुप्त गुहा दडलेली मिळाली आहे.

Advertisement

ही गुहा 12 व्या शतकात नाइट्स टेम्पलर नावाच्या एका प्रसिद्ध कॅथोलिक लढाऊ संघटनेने तयार केली होती असा दावा केला जातो. नाइट्स टेम्पलर ही संघटना जेरूसलेम येथे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षसाठी स्थापन करण्यात आली होती आणि नंतर ही युरोपमधील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली संघटना ठरली होती. 14 व्या शतकात ही संघटन बंद करण्यात आल्यावर त्याच्याशी निगडित अनेक रहस्यमय कथा निर्माण होऊ लागल्या. याचमुळे लोकांनी या गुहेलाही नाइट्स टेम्पलरचा 700 वर्षे जुना गुप्त अ•ा मानले आहे. परंतु इतिहासकार आणि तज्ञांनी याची तपासणी केली असता वेगळेच सत्य समोर आले.

प्रत्यक्षात ही गुहा 700 वर्षे जुनी नव्हे तर फार तर 200 वर्षे जुनी असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच नाइट्स टेम्पलर अस्तित्वहीन झाल्याच्या सुमारे 500 वर्षांनी ही गुहा निर्माण करण्यात आली होती. 19 व्या शतकात तेथे दगडांची खाण असायची, जेथून बलुआ दगड काढले जात होते, नंतर जमिनीच्या मालकाने या खाली ठिकाणाला सजविण्यासाठी सुंदर खांब, मेहराब आणि मेणबत्ती ठेवण्यासाठी छोट्या संरचना तयार करत एक सुंदर गुहेचे रुप दिले होते असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.