For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खोदकामावेळी मिळाली रहस्यमय तलवार

06:17 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
खोदकामावेळी मिळाली रहस्यमय तलवार
Advertisement

महायुद्धकालीन तळघरात सापडला खजिना

Advertisement

पुरातत्व तज्ञांना अनेकदा थक्क करणाऱ्या गोष्टी अजब ठिकाणी मिळत असतात. असेच काही जर्मनीत दिसून आले आहे. बर्लिनमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ढिगाऱ्यादरम्यान शतकांपेक्षा जुनी समुराई तलवार सापडली आहे. ही तलवार 16 व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ही तलवार जर्मनीत कशी पोहोचली यावरून तज्ञ अनेक प्रकारच्या शक्यता व्यक्त करत आहेत.

ही तलवार शहरातील सर्वात जुना चौक मोलकेनमार्कटच्या खाली मिळाली होती. वरील इमारत नष्ट झाल्यावर तेथे एक तळघर होते. युद्धानंतर तळघराला वरील अवशेषांनी भरून टाकण्यात आले होते. मग 1690 च्या दशकात रस्ता रुंद करण्यात आल्यावर हे तळघर रस्त्याखाली आले हेते.

Advertisement

मोलकेनमार्कटच्या पूर्व तळघरांचे खोदकाम करताना पुरातत्व तज्ञांनी युद्धाच्या अखेरीस घाईगडबडीत लपविण्यात आलेल्या अनेक सैन्य कलाकृतींचा शोध लावला आहे. यात 16 व्या शतकातील जपानी छोटी तलवार वाकिजाशी सामील आहे. जी स्वत:च्या मूळ भूमीपेक्षा किमान 5000 मैल अंतरावर जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आढळून आली आहे.

हा आश्चर्यजनक शोध असून ही तलवार जपन स्वत:च्या साकोकू किंवा बंद देश धोरणामुळे उर्वरित जगापासून एकाकी असतानाच्या काळातील असू शकते असे उद्गार बर्लिन राज्य पुराततत्व तज्ञ आणि शहराच्या संग्रहालयाचे संचालक मॅथियास वेमहॉफ यांनी काढले आहेत.

तलवार बर्लिनमध्ये कशी पोहोचली याचा केवळ अनुमान व्यक्त करता येतो असे त्यांनी म्हटले आहे. तलवार 1862 मध्ये युरोपमधील पहिला जपानी दूतावास टेकेनोची मिशनदरम्यान भेटवस्तू म्हणून देण्यात आल्याचेही मानले जात आहे. तसेच 11 वर्षांनी एक अन्य राजनयिक दौरा इवाकुरा मिशनदरम्यान ही तलवार भेटवस्तू म्हणून प्रदान करण्यात आलेली असू शकते. दोन्ही घटनांवेळी कॅसर विल्हेम प्रथमने बर्लिनर श्लॉसमध्ये अतिथींचे स्वागत केले होते. हे ठिकाण संबंधित स्थळापासून फार लांब नव्हते. तलवारीला गंज लागली असून याच्या मुठीचे नुकसान झाले असले तरीही त्याचे अन्य हिस्से कायम राहिले आहेत

Advertisement
Tags :

.