For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाळवंटात मातीने निर्मित रहस्यमय किल्ला

06:35 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाळवंटात मातीने निर्मित रहस्यमय किल्ला
Advertisement

युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत सामील

Advertisement

मोरक्कोच्या खडकाळ वाळवंट आणि हाय अॅटलस पर्वतांच्या तळाशी वसलेले अत-बेन-हादू शहर जगातील सर्वात अनोख्या आणि सुंदर मानवनिर्मित आश्चर्यांपैकी एक मानले जते. मातीने निर्मित उंच इमारती आणि चहुबाजूला उभ्या सुरक्षात्मक भिंती या ठिकाणाला एखाद्या जादुई जगाचे रुप देतात. वास्तुकलेच्या भाषेत अशाप्रकारच्या तटबंदी शहराला कसार म्हटले जाते.

माती आणि लाकडाने निर्मित या आकर्षक किल्ल्यांना दक्षिण मोरक्कोच्या प्राचीन स्थापत्यकलेचा सर्वात बेजोड आणि सर्वात सुरक्षित नमुना मानले जाते, ज्याला पाहून जगभरातील पर्यटक दंग होतात. वाळवंटादरम्यान वसलेल्या या नाट्यामय आणि रहस्यमय शहराने हॉलिवूडचे लक्ष देखील स्वत:कडे वेधून घेतले आहे.

Advertisement

1987 साली युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळ घोषित करण्यात आलेल्या या शहराचा वापर 24 हून अधिक सुपरहिट हॉलिवूडपट आणि वेबसीरिजच्या चित्रिकरणासाठी बॅकड्रॉप म्हणून करण्यात आलेला आहे. लॉरेन्स ऑफ अरेबिया, द ममी, ग्लॅडिएटर, अलेक्झेंडर आणि जगभरात लोकप्रिय झालेली सीरिज ‘गेम ऑफ थ्रोन्स’ यासारख्या मोठ्या प्रोजेक्ट्सचे चित्रिकरण याच ऐतिहासिक मातीच्या शहरात झाले आहे.

स्थानिक मान्यतांनुसार या शहराची स्थापना ईसवी सन 750 साली बेन-हादू नावाच्या व्यक्तीने केली होती, ज्याचे थडगे आजही या शहराच्या मागे कुठे तरी दफन असल्याचे मानले जाते. परंतु येथील इमारतींची निर्मिती 17 व्या शतकापेक्षा जुनी नाही. या इमारतींची निर्मितीशैली आणि तंत्रज्ञान मात्र शतकांपेक्षा जुने आहे. हे शहर ऐतिहासिक स्वरुपात सहारा वाळवंटाला मराकेश शहराशी जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्यापारी मार्गावर स्थित होते.

16 व्या शतकात या व्यापारी मार्गाचे महत्त्व कमी होण्यासोबत या शहरातील झगमगाट देखील घटू लागला. आता बहुतांश मूळ रहिवासी नदीच्या दुसऱ्या काठाला निर्माण झालेल्या आधुनिक गावात स्थायिक झाले आहेत. परंतु काही परिवार आजही या प्राचीन कसारच्या आत पारंपरिक जीवन जगत आहेत. 1962 मध्ये प्रसिद्ध चित्रपट ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’चे चित्रिकरण सुरू असताना दिग्दर्शक डेव्हिड लीन यांनी या कसारमधील अनेक ढासळणाऱ्या मातीच्या घरांची दुरुस्ती करविली होती. यानंतर युनेस्कोकडून दर्जा मिळाल्यावर सरकारी स्तरावर याच्या संरक्षणाचे काम सुरु झाले. आजही समोरून हे शहर अत्यंत सुंदर आणि मजबूत स्थिती दिसते, परंतु याच्या मागील हिस्स्यात निर्माण अनेक जुन्या इमारती आणि मातीचे महाल देखभालीच्या अभावी ढासळण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांना त्वरित दुरुस्तीची नितांत आवश्यकता आहे.

Advertisement
Tags :

.