महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिद्धेश नाईक विरोधात अविश्वास ठराव शक्य

12:10 PM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीमध्ये भाजप मंडळातच बंडाळी सुरू झाली असून जिल्हा पंचायतीची तातडीने बैठक बोलवावी, अशी जोरदार मागणी भाजपच्याच सदस्यांनी केली असून विद्यमान अध्यक्ष सिद्धेश नाईक यांच्या विरोधात अविश्वास ठराव येण्याची शक्यता आहे. जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांच्यासह 15 सदस्यांनी जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षांना पत्र लिहून तातडीने जिल्हा पंचायतीची बैठक बोलविण्यात यावी अशी मागणी केली आहे. दर दोन महिन्यांमध्ये बैठक घेणे आवश्यक असून त्याची पूर्तता विद्यमान अध्यक्ष करीत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यमान जिल्हा पंचायत मंडळावर भाजपची सत्ता असून विद्यमान अध्यक्ष सिद्धेश नाईक यांना अध्यक्षपद भूषविण्यासाठी दिलेली मुदत संपुष्टात झाली आहे. त्या जागी आता गिरीश उस्कईकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, परंतु त्यासाठी सिद्धेश नाईक यांनी राजीनामा देणे आवश्यक आहे. त्यांनी राजीनामा दिला नसल्यामुळे नूतन अध्यक्ष निवडणे शक्य होत नाही. अनेक दिवस वाट पाहून जिल्हा पंचायत सदस्यांनी आता तातडीची बैठक बोलवावी, अशी जोरदार मागणी केली आहे. यामुळे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीमध्ये वातावरण बरेच तापलेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article