सिंहासारखा चेहरा असणारे माकड
ब्राझीलमध्ये आढळून येणारे ‘ब्लॅक-फेस्ड लायन टॅमरिन जगातील दुर्लभ माकडांच्या प्रजातींमध्ये सामील आहे. याच्या चेहऱ्याचा रंग काळा आणि शरीरावर सोनेरी-नारिंगी केस असतात. डोके आणि मानेच्या आसपास लांब केस असल्याने याचे नाव लायन टॅमरिन पडले आहे. हे छोटे माकड झाडांवर राहते आणि याची पूर्ण जंगली संख्या 400 पेक्षाही कमी मानली जाते. आता याला येलो फीवर यासारख्या आजारापासून वाचविण्यासाठी पहिल्यांदा जंगलात व्हॅक्सीन देण्यात आली आहे.
जुलै महिन्यात ब्राझीलच्या पराना प्रांताच्या सुपरागुई नॅशनल पार्कमध्ये तीन ब्लॅक-फेस्ड लायन टॅमरिनला येलो फीवरची व्हॅक्सीन देण्यात आली. यात दोन नर आणि एक मादी होते. या प्रजातीची संख्या पूर्वीच कमी झाली आहे आणि जंगलात आजाराचा मोठा प्रकोप यासाठी गंभीर धोका ठरू शकतो म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. आययूसीएनच्या वर्तमान यादीत ब्लॅक-फेस्ड टॅमरिनला एंडेंजर्ड म्हणजेच संकटग्रस्त ठरविण्यात आले आहे.
केवळ ब्राझीलमध्ये अस्तित्व
ब्लॅक-फेस्ड लायन टॅमरिनचे शास्त्राrय नाव लियोन्टोपिथेकस कैसारा आहे. हे जगात केवळ ब्राझीलच्या अटलांटिक फॉरेस्टमध्ये आढळून येते. याचा भाग मुख्यत्वे पराना आणि साओ पावलोच्या काही किनारी हिस्स्यांपर्यत मर्यादित आहे. म्हणजेच याच पूर्ण नैसर्गिक संख्या एकाच देशाच्या छोट्याशा भागात राहते.
हे आकारात छोटे माकड असून आणि बहुतांश वेळ झाडांवर राहते. हे दिवसा सक्रीय राहते आणि सर्वसाधारणपणे छोट्या समुहांमध्ये राहते. याच्या आहारात फळे, फुलं, नेक्टर आणि झाडांमधून निघणारा गोंद सामील आहे. हे कीडे आणि इतर छोटे जीव देखील फस्त करत असते.
जंगल कमी होणे मोठी समस्या
या प्रजातीसाठी आजारासोबत घटते अन् विभागत जाणारे जंगल मोठी समस्या ठरले आहे. अटलांटिक फॉरेस्टचा मोठा हिस्सा पूर्वीच संपुष्टात आला आहे आणि उर्वरित जंगल अनेक छोट्या हिस्स्यांमध्ये विभागले गेले आहे. यामुळे ब्लॅक-फेस्ड लायन टॅमरिनच्या वेगवेगळ्या समुहांदरम्यान संपर्क कमी होतो.
तर एखाद्या प्राण्याची संख्या छोट्या छोट्या समुहांमध्ये विभागते, तेव्हा त्याच्यासाठी इतर समुहांपर्यंत पोहोचणे आणि परस्परांमध्ये प्रजनन करणे अवघड ठरू शकते. यामुळे दीर्घकाळात त्यांची संख्या आणि जेनेटिक विविधतेवर प्रभाव पडू शकतो. याचमुळे उर्वरित जंगलाला सुरक्षित ठेवणे या प्रजातीच्या संरक्षणाचा महत्त्वाचा हिस्सा आहे.
येलो फीव्हरमुळे का धोका
ब्लॅक-फेस्ड लायन टॅमरिनसाठी येलो फीवर एक वेगळ्या प्रकारचा धोका आहे. हा व्हायरसद्वारे होणारा आजार असून तो मच्छरांद्वारे फैलावतो. ब्राझीलच्या अटलांटिक फॉरेस्टमध्ये येलो फीवरच्या प्रकोपामुळे अनेक जंगली प्रायमेट्स प्रभावित झाले आहेत. छोटी संख्या असलेल्या प्रजातीत आजाराचा प्रभाव अधिक गंभीर असू शकतो. जर एकाच भागात राहणारे अनेक प्राणी संक्रमित झाल्यास पूर्ण स्थानिक संख्या वेगाने घटू शकते. हाच धोका पाहता वैज्ञानिकांनी ब्लॅक-फेस्ड लायन टॅमरिनला प्रथम व्हॅक्सीन देण्याचा निर्णय घेतला.

पहिल्यांदाच जंगलात व्हॅक्सीन
या अभियानात तीन ब्लॅक-फेस्ड लायन टॅमरिनला काही काळासाठी सुरक्षित पद्धतीने पकडण्यात आले. त्यांना व्हॅक्सीन देण्यासोबत रक्त आणि इतर नमुने मिळविण्यात आले. त्यांच्या ओळखीसाठी मायक्रोचिप आणि देखरेखीसाठी रेडिओ कॉलर लावण्यात आले. यानंतर तिघांना परत जंगलात सोडण्यात आले.
व्हॅक्सीननंतर वैज्ञानिक त्यांची प्रकृती आणि शरीरात निर्माण होणाऱ्या इम्यून प्रतिक्रियेवर नजर ठेवत आहेत. अद्याप कुठल्याही गंभीर दुष्परिणामांची माहिती मिळालेली नाही. या प्रारंभिक निष्कर्षांच्या आधारावर पुढील काळात इतर ब्लॅक-फेस्ड लायन टॅमरिनला व्हॅक्सीन देण्याचे काम केले जाऊ शकते.

माकडांना वाचविण्याची आवश्यकता
ब्लॅक-फेस्ड लायन टॅमरिनची संख्या अत्यंत कमी झाली असून त्यांचा नैसर्गिक अधिवास देखील मर्यादित आहे. याचबारेबर जंगल कमी होणे आणि येलो फीवरसारख्या आजाराचा धोका कायम आहे. याचमुळे केवळ व्हॅक्सीन देणेच या प्रजातीला वाचविण्याचा उपाय नाही. याचा अधिवास वाचविणे, वेगवेगळ्या समुहांच्या भागांना जोडणे आणि आजाराच्या फैलावावर नजर ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. जंगलात पहिल्यांदाच झालेले व्हॅक्सिनेशन याच मोठ्या संरक्षण प्रयत्नांचा एक हिस्सा आहे.
