महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्लॅमरचे जग सोडून जंगलात फिरणारी मॉडेल

06:50 AM Nov 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जुन्या बसमध्ये वास्तव्य

Advertisement

ग्लॅमरचे जग अनुभवण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु काही लोकांना ग्लॅमरवर्ड पचनी पडत नाही. अमेरिकेतील एका मॉडेलसोबत काहीसे असेच घडले आहे. या मॉडेलने स्वत:च्या जीवनाला अशाप्रकारे बदलले आहे की आता लोकांना प्रथमदर्शनी विश्वासच बसणार नाही.

Advertisement

हॉलिवूडमध्ये प्रख्यात राहिलेली लॉरा ला हिने स्वत:च्या जीवनाला ज्याप्रकारे बदलले आहे, तसे करणे प्रत्येकालाच शक्य नाही. ग्लॅमरच्या जगतातून बाहेर पडत लॉरा आता जंगलांमध्ये भटकंती करत आहे. एका जुन्या बसमधून तिचा हा प्रवास सुरू आहे. लॉस एंजिलिसचे चमकणारे जीवन सोडून देत ती शेतांमध्ये काम करते आणि तेथेच राहत आहे.

32 वर्षीय लॉराने वयाच्या 16 व्या वर्षीच शिक्षण सोडून दिले होते. स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती ग्लॅमरच्या दुनियेत दाखल झाली होती. ती मॉडेलिंग करायची आणि ऐषोरामात जगत होती. प्रसिद्ध फोटोग्राफर्ससोबत तिने काम केले आहे. लियोनार्डो डिकेप्रियोसोबत तिचे नाव जोडले गेले होते. मी अत्यंत नैसर्गिक वातावरणात वाढले होते. याचमुळे मला निसर्गातच शांती मिळाल्याचे लॉरा सांगते. लॉरा आता ग्लॅम लाइफ सोडून स्वत:च्या आईच्या 72 एकरच्या शेतजमिनीत येऊन राहत आहे. सैंटा पाउलामध्ये असलेल्या फार्ममध्येच तिने स्वत:ची 12 फूटची केबिन तयार केली होती, जी एका आगीत जळून  गेली आहे.

मुलीसोबत बसमध्ये वास्तव्य

आईच्या शेतजमिनीत काम करताना लॉराचे एका इसमावर प्रेम जडले, परंतु लॉरा गरोदर राहिल्यावर त्यांचे नाते संपुष्टात आले. मुलीकरता असे भटकंतीचे जीवन जगता येणार नाही असे उमगल्यावर तिने ओजाई नावाच्या ठिकाणी स्वत:चे एक घर जुन्या स्कुलबसमध्ये निर्माण केले. या बसमध्ये ती आता मुलीसोबत राहत आहे. युट्यूबवर ती स्वत:च्या आयुष्याला चाहत्यांसोबत शेअर करत आहे. टीचिंग वर्कशॉप, ट्यूटोरियल आणि टाय-डाय कपडे तयार करून ती स्वत:चा वेळ व्यतित करते. तिच्यासोबत तिची 18 महिन्यांची मुलगी देखील राहते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article