For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत अल्पवयीन मुलीची काढली छेड

12:07 PM Aug 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीत अल्पवयीन मुलीची काढली छेड
Advertisement

नातेवाईक आणि नागरिकांकडून युवकाला चोप

Advertisement

सावंतवाडी -

सावंतवाडी शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिची छेड काढल्याप्रकरणी एका अल्पवयीन युवकाला मुलीच्या नातेवाईकांनी आणि उपस्थित नागरिकांनी यथेच्छ चोप दिला. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. सदर अल्पवयीन मुलगी एकटी जात असल्याचे पाहून युवकाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने घरी जात याबद्दलची माहिती आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आईने आपली दुचाकी बाहेर काढत त्या युवकाचा पाठलाग केला. दुचाकी चालवत असताना सदर युवक भरधाव गाडी चालवण्याच्या नादात विद्युत खांबाला जाऊन धडकला,त्यामुळे तो नागरिकांच्या कचाट्यात सापडला. नातेवाईक आणि इतर नागरिकांच्या मदतीने या युवकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु , उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या युवकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.