महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या बसला महामार्गावर दुधाच्या टँकरने ठोकरले

11:09 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

16 विद्यार्थी जखमी : सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

Advertisement

बेळगाव : दुधाच्या टँकरने विद्यार्थी प्रवास करीत असलेल्या बसला पाठीमागून ठोकरल्याने कोल्हापूर येथील 16 विद्यार्थी जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामहट्टीजवळ हा अपघात घडला आहे. कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अॅग्रिकल्चर कॉलेजचे विद्यार्थी बसमधून शैक्षणिक प्रवासासाठी गेले होते. धारवाड विद्यापीठ व बेळगाव येथील आरसीयूला भेट दिल्यानंतर कोल्हापूरला परतताना भुतरामहट्टीजवळ दुधाच्या टँकरने बसला पाठीमागून ठोकरल्याने हा अपघात घडला आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी यासंबंधी माहिती दिली असून जखमी विद्यार्थ्यांवर सिव्हिल  हॉस्पिटल व खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असून रात्री उशिरापर्यंत काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article