महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

असाही स्नेहाचा निरोप !

12:57 PM Dec 05, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

नौदल दिनातील अग्नीशमन पथकातील कर्मचाऱ्यांचा सत्कार ; मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे सर्वांनी मानले आभार

Advertisement

मालवण / प्रतिनिधी

Advertisement

मालवण शहरात गेले अनेक दिवस राज्यभरातील अनेक अग्नीशमन दलाची पथके नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी दाखल झाली होती. सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत या पथकांनी आपापल्या परीने योगदान दिले होते. आज मंगळवारी या सर्व पथकांना मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी अभिनव पद्धतीने निरोप दिला. सर्व पथकांना मानपत्र आणि सर्व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

नगरपालिकेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सर्व पथकांनी आनंद व्यक्त करत आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल नगरपालिकेचे आभार मानले. सर्व अग्नीशमन बंब मार्गस्थ होत असताना पालिकेने भोंगा वाजवत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याधिकारी संतोष जिरगे व सर्व कर्मचारी यांनी हात वर करून अभिवादन करत निरोप घेतला. हा कार्यक्रमामध्ये अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व कर्मचारी यांचे सर्वांनी आभार मानले .

Advertisement
Tags :
# tarun bharat news# malvan # nevy day #
Next Article