For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रलंबित कामांबाबत मंत्रालयात बैठक होणार

12:06 PM Dec 31, 2024 IST | Radhika Patil
प्रलंबित कामांबाबत मंत्रालयात बैठक होणार
A meeting will be held in the ministry regarding pending works.
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

जलजीवन मिशन, राष्ट्रीय महामार्ग, प्रकल्पग्रस्त तसेच कागल येथील म्हाडा अशा विविध विषयांवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात बैठक घेतली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयीनस्तरावर प्रलंबित असणाऱ्या विषयांबाबत पुढील आठवड्यात बैठका लावणार असल्याचे स्पष्ट केले.तसेच शासनस्तरावरील प्रलंबित कामांबाबत मंत्रालयात बैठका होणार असल्याचे सांगितले.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीत मौ.चिमणे व उत्तूर, ग्रामपंचायत येथील जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांना वीजपुरवठा करण्याबाबत चर्चा झाली. वीज बील थकबाकीमुळे वीजेचा पुरवठा थांबला असल्याचे वीज महामंडळाकडून सांगण्यात आले. जून 2022 नंतरची सर्व आवश्यक थकबाकी भरल्यानंतरच नवीन वीज जोडणी संबंधित ग्रामपंचायतीला देता येणार आहे. याबाबत गावाने पुर्तता करून चिमणेसाठी 7 लक्ष व उत्तूरने 12 लक्ष रूपये वीजबील तातडीने भरून योजना सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आंबेओहळ प्रकल्पातील प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत व आंबेओहळ प्रकल्पातील संकलन दुरुस्तीची (रिव्हीजन) अप्पर जिल्हाधिकारी,कोल्हापूर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत चर्चा यावेळी झाली. यातील 5 जणांचे वाटप आदेश देण्यात आले आहेत. भूखंड वाटपाबाबत ज्यांचे 50 पॅकेज दिले आहे त्यांनीच आवश्यक बदलाचे तपशील सादर करावेत अशा सूचना देण्यात आल्या. यातील महसूल खात्याकडील प्रलंबित विषयाशी संबंधित बैठक मंत्रालयात लवकरच लावणार असल्याचे सांगितले.

Advertisement

कागल येथील गायरानमध्ये ख्रिश्चन दफनभूमीची जागा ख्रिश्चन समाजास हस्तांतरीत करण्याबाबत चर्चा झाली. कागल येथील गट नं. 542 गायरान जमीनपैकी 0.20 गुंठे जमीन नगरपरिषद, कागल यांना म्युनिसिपल वापराकरीता देण्याबाबत व कागल येथील गट नं. 385/अ गायरान जमीनपैकी 0.08 गुंठे जमीन नगरपरिषद, कागल यांना म्युनिसिपल वापराकरीता देण्याबाबत चर्चा झाली. याबातच नगरपालिका ठराव व आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

कागल ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे तसेच नवीन मंजूर असलेल्या उड्डाणपूलाच्या कामात दिरंगाई व सुरू असलेल्या कामामुळे नाहक त्रास लोकांना होत आहे अशी तक्रार ग्रामस्थांनी मांडली. संबंधित विभागाकडून जून 2025 मुदत संबंधित ठेकेदारास दिली असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे,अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख, तहसिलदार व प्रांत उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.